सेल्फीच्या नादात तोल गेला आणि बुडून मृत्यू झाला

Dhule News : मकरंदचा शोध घेण्यासाठी जीवरक्षकांना बोलविले. त्यांनी शोध घेऊनही मकरंद आढळला नाही.
drowned
drowned
Summary

तिघे तलवाजवळ सेल्फी घेताना तोल गेल्याने पडले. त्यांनी आरडाओरड केल्यानंतर परिसरातील नागरिक मदतीसाठी धावून आले.



धुळे: मोराणे शिवारातील हरण्यामाळ तलाव (Haranyamal Lake) परिसरात सेल्फी (Selfie) घेताना तिघे तरुण तोल गेल्याने तलावात पडले. त्यात दोघांना वाचविण्यात यश आले. मात्र, एकजण गाळात अडकल्याने त्याचा मृत्यू झाला. त्याचा मृतदेह शोधण्यासाठी सोमवारी सकाळी एसडीआरएफ पथक कार्यरत होते. काही कालावधीनंतर तरुणाचा मृतदेह (Young man drowned) हाती लागला.

drowned
जळगाव जिल्ह्यात मतदार नावनोंदणीत महिला मागे


या घटनेत मकरंद अजय पावटे (वय २२, रा. प्लॉट नंबर २०, वक्रतुंड सोसायटी, वाडीभोकर रोड, देवपूर, धुळे) याचा बळी गेला आहे. तो रविवारी (ता. १) सायंकाळी प्रशांत किशोर सोनवणे, अक्षय सुनील पाटील, कुणाल प्रवीण निमबड, विवेक घुगे या मित्रांसह हरण्यामाळ तलाव परिसरात गेला होता. यातील तिघे तलवाजवळ सेल्फी घेताना तोल गेल्याने पडले. त्यांनी आरडाओरड केल्यानंतर परिसरातील नागरिक मदतीसाठी धावून आले.

drowned
जळगाव जिल्ह्यातून कोरोनाचा परतीचा प्रवास सुरु !

त्यांनी दोघांना वाचविले. मात्र, मकरंद पावटे गाळात रुतल्याने बेपत्ता झाला. घटनेची माहिती मिळताच पावटे कुटुंबीय तलावाजवळ दाखल झाले. मकरंदचा शोध घेण्यासाठी जीवरक्षकांना बोलविले. त्यांनी शोध घेऊनही मकरंद आढळला नाही. त्यानंतर एसडीआरएफचे पथक शोध कार्यासाठी सोमवारी (ता. २) दाखल झाले. काही कालावधीनंतर मकरंद हाती लागला. त्याला हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयाने तपासणीअंती मृत घोषित केले. मकरंद हा महापालिकेचे ओव्हरसियर हेमंत पावटे यांचा पुतण्या आहे. या घटनेची तालुका पोलिस ठाण्यात नोंद झाली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com