खानदेशात कोरोनाचे तीन हजार ९७८ बळी

खानदेशात कोरोनाचे तीन हजार ९७८ बळी
corona update
corona updatesakal

धुळे : सव्वा वर्षापासून ठाण मांडलेल्या कोरोना महामारीच्या (Coronavirus) पहिल्या व दुसऱ्या लाटेने खानदेशात आतापर्यंत तीन हजार ९७८ जणांचा जीव घेतला आहे. जळगाव, नंदुरबार व धुळे जिल्ह्यांत दोन लाख २० हजार ९०९ रुग्ण आढळून आले आहेत. त्यांपैकी दोन लाख आठ हजार ५१५ जण कोरोनामुक्त (corona patient recover khanadesh) झाले आहेत. खानदेशात कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. (dhule-coronavirus-four-thousand-death-in-khanadesh-aria)

आरोग्य विभागातर्फे बुधवारी १८ ते २४ मे या आठवडाभराचा जिल्हानिहाय अहवाल जाहीर करण्यात आला. त्यात जळगाव जिल्ह्याचा (Jalgaon corona update) पॉझिटिव्हिटी रेट ३.८३ टक्के, नंदुरबार ४.१५, तर धुळे जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट ५.७१ टक्क्यांवर आल्याचे घोषित करण्यात आले. पंधरा दिवसांत जळगाव जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट तब्बल पाच टक्क्यांनी कमी झाल्याने दिलासादायक परिस्थिती निर्माण झाली आहे.

corona update
बांधकामे ‘लॉक’ तरीही.. वाळूउपसा जोमात

९८३ सक्रिय रूग्‍ण

पहिल्या व दुसऱ्या लाटेने धुळे (Dhule corona update) जिल्ह्यात ६६३ बाधितांचा बळी घेतला आहे. जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्यापासून ही संख्या बुधवारपर्यंत ४१ हजार ८६८ पर्यंत पोचली. त्यात ० ते १७ वयोगटातील रुग्णांची संख्या दोन हजार ४५३ राहिली. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत याच वयोगटातील १२० जणांना बाधा झाली. एकीकडे कोरोनाबाधितांची संख्या कमी-अधिक होत असून, दुसरीकडे कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. आतापावेतो जिल्ह्यात ४० हजार २२३ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्यात कोरोनाचे ९८३ सक्रिय रुग्ण आहेत.

लसीकरण मोहिमेचा परिणाम

धुळे शहरात कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत आहे. शहरात १७ हजार ९२० कोरोनाबाधित आतापर्यंत आढळले आहेत. त्यांपैकी १७ हजार १९५ जणांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनाबाधितांप्रमाणेच शहर परिसरातील मृतांची संख्याही कमी-अधिक होत आहे. गेल्या पाच दिवसांपासून कोणत्याही बाधिताचा मृत्यू झाला नसताना बुधवारी (ता. २६) एका बाधिताचा मृत्यू झाला. त्यामुळे ही संख्या आता ६६३ एवढी झाली आहे. पहिल्या व दुसऱ्या लाटेत शहरी भागात २५७ जणांचा, तर ग्रामीण भागातील ४०६ मृतांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी प्राप्त अहवालानुसार शहरात ३० कोरोना रुग्णांची नोंद झाली. शहरात सातत्याने कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांपासून ५० च्या आतच आहे. जिल्हा प्रशासनाने घातलेले कठोर निर्बंध तसेच आरोग्य यंत्रणेने जानेवारीपासून राबविलेल्या लसीकरण मोहिमेचा परिणाम म्हणून रुग्णसंख्या घटते आहे. रुग्ण कमी होत असल्याने प्रशासनावरील ताण हलका होत आहे. दुसरी लाट लवकर नियंत्रणात येत असल्याने लोकांना थोडासा दिलासा मिळाला आहे.

खानदेशातील कोरोनास्थिती (ता. २६ मे २०२१ पर्यंत)

जिल्हा... एकूण रुग्ण.. कोरोनामुक्त.. नवे रुग्ण.. एकूण मृत्यू.. पॉझिटिव्हिटी रेट

जळगाव..१,३९,१३७..१,३०,०५७.. २२१...... २,५१०...…. ३.८३ टक्के

नंदुरबार..३९,९०४.... ३८,३७७...... ५२...….. ८०५....…. ४.१५ टक्के

धुळे….. ४१,८६८.... ४०,०८१..... ४४...….. ६६३...…... ५.७१ टक्के

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com