esakal | धुळ्यात आठ मृत्‍यू; कोरोना नव्‍हे तर आहे वेगळे कारण

बोलून बातमी शोधा

death

धुळ्यात आठ मृत्‍यू; कोरोना नव्‍हे तर आहे वेगळे कारण

sakal_logo
By
टिम इ सकाळ

धुळे : महापालिका क्षेत्रात पाणीपुरवठा, रस्ता काँक्रिटीकरणाच्या कामाची फाईल गहाळ झाली असेल, तर या प्रश्‍नी चौकशी अहवाल मागविला जाईल, दोषींवर गुन्हा दाखल केला जाईल, असे स्पष्टीकरण स्थायी समिती सभापती संजय जाधव यांनी सभेत दिले. पाणीपुरवठा योजनेच्या नोंदीची फाईल गहाळ होणे, अशुद्ध आणि अनियमित पाणीपुरवठा, शुद्धीकरणाबाबत उपाययोजना न करणे, असे अनेक मुद्दे उपस्थित करीत सदस्यांनी महापालिका प्रशासनाला धारेवर धरले.

सभापती जाधव यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची साप्ताहिक सभा झाली. उपायुक्त शिल्पा नाईक, नगरसचिव मनोज वाघ तसेच नगरसेवक सुनील बैसाणे, शीतल नवले, अमोल मासुळे, नागसेन बोरसे, अमिन पटेल, कमलेश देवरे, नगरसेविका किरण कुलेवार, भारती माळी, हिना पठाण आदींसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

आठ जणांचा मृत्यू

दूषित पाणीपुरवठ्यामुळे सात ते आठ जणांचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप नगरसेवक पटेल यांनी केला. स्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वी पाणीपुरवठ्याच्या शुद्धीकरणाबाबत काळजी घ्यावी, अशी मागणीही श्री. पटेल यांनी केली. शुद्ध पाणीपुरवठा झाला नाही, तर पुढील बैठकीत थेट धरणे आंदोलन केले जाईल, असा इशारा स्थायी समितीच्या सदस्यांनी दिला. रमापती चौक आणि देशमुख वाड्यात तक्रारी असूनही पाणीपुरवठ्यात सुधारणा होत नसल्याचे सांगत यावर कार्यवाही झाली नाही, तर पुढील बैठकीत ठाण मांडून बसू, असा इशारा नगरसेवक बैसाणे यांनी दिला. किमान पाणीपुरवठ्याबाबत प्रशासनाने गंभीर व्हावे, अशी अपेक्षा नगरसेविका माळी यांनी व्यक्त केली. अपेक्षीत सुधारणा केल्या जातील, असे आश्वासन देत सभा गुंडाळण्यात आली.

नगरसेवकांच्या तक्रारी, आरोप

नगरसेवक नवले यांनी दलित वस्ती सुधार योजनेंतंर्गत प्रभाग सातमध्ये केलेल्या पाणीपुरवठ्याच्या कामाची फाईल गहाळ झाल्याचे सांगत चौकशीअंती दोषींवर कारवाईची मागणी केली. नगरसेवक बैसाणे यांनी मनपातून नस्ती गहाळ व चोरी होत असल्याचा आरोप केला. एका प्रकरणात पोलिसांकडे तक्रार केल्यावर अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला. अज्ञात व्यक्ती मनपात येते कशी? प्रभाग सातमध्ये नागरी दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत कॉंक्रिटीकरणासाठी १६ लाखांच्या कामाबाबत कार्यादेश दिला, तरी नस्ती चोरीस गेल्याचे समजले. त्यावर सभापती जाधव यांनी नस्तीचा तपास लागला नाही, तर गुन्हा दाखल करा, असा आदेश दिला. नगरसेवक नवले म्हणाले, की मोजमाप पुस्तिकेत नोंद घेतली जात नाही. एमबी बुक सापडत नसल्याची उत्तरे संबंधित देतात. याबाबत शिस्त लावावी. शहरात लॉकडाउन असताना दुकाने, व्यवहार सुरू आहेत. रस्त्यावर, बाजारपेठेत नागरिकांनी गर्दी दिसते. मग कोरोना कसा जाईल? मनपाने ॲक्शन मोडमध्ये यावे, अशी सूचनाही नगरसेवक नवले यांनी केली.

हॉटेलचे झाले कोरोना हॉस्पिटल

नगरसेविका हिना पठाण यांनी सांगितले, की शहरातील चाळीसगाव रोड परिसरात एक हॉटेल आहे. तेथे कोरोनाकाळात चार ते पाच खाटा टाकून हॉस्पिटलमध्ये रूपांतर करण्यात आले. यात डॉक्टर नव्हे, तर फक्त कर्मचारी असतात. तेथे एका रुग्णाचा मृत्यू झाला. त्याचे तब्बल तीन लाख रुपये बिल काढण्यात आले. बिलाशिवाय मृतदेह ताब्यात देणार नसल्याचे कथीत हॉस्पिटलने सांगितले. याबाबत तक्रार झाल्यावर हे बिंग फुटले. या प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अधिकाऱ्यांनी चौकशी करावी, अशी मागणी नगरसेवक बैसाणे यांनी केली.