esakal | शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या कार्यालयात घेतले स्वतःला कोंडून,
sakal

बोलून बातमी शोधा

शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या कार्यालयात घेतले स्वतःला कोंडून,

जोपर्यंत आमचे पैसे मिळत नाही तोपर्यंत या कार्यालयाच्या बाहेर जाणार नाही असे ठणकावून सचिव अशोक मोरे यांना सांगण्यात आले यावेळी शेतकऱ्यांनी संतप्त भावना व्यक्त करीत सचिवांना चांगलेच धारेवर धरले. 

शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या कार्यालयात घेतले स्वतःला कोंडून,

sakal_logo
By
भरत बागुल

पिंपळनेर : गेल्या पंधरा महिन्यापासून शेतकऱ्यांचे पैसे मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या कार्यालयात स्वतःला कोंडून घेतल्याचा प्रकार सोमवार बाजार समिती कार्यालयात घडला शेतकरी व बाजार समिती यांच्यातील वाद सोडविण्यासाठी यावेळी पीएसआय भूषण हंडोरे घटनास्थळी येऊन शेतकऱ्यांची संवाद साधला.


गेल्या पंधरा महिन्यापासून शेतकऱ्यांचे पैसे मिळत नसल्याने शेतकऱ्यांना मिळालेल्या आश्वासन आधारे शेतकऱ्यांनी आज येथील उपबाजार समितीच्या कार्यालयात येऊन सचिव यांची भेट घेतली व पैसे करून द्या असे सांगत शेतकरी कार्यालयात बसून होते. पंधरा महिने होऊन देखील शेतकऱ्यांना पैसे न मिळाल्याने शेतकऱ्यांनी स्वतःहून कार्यालयात स्वतःला कोंडून घेतले. जोपर्यंत आमचे पैसे मिळत नाही तोपर्यंत या कार्यालयाच्या बाहेर जाणार नाही असे ठणकावून सचिव अशोक मोरे यांना सांगण्यात आले यावेळी शेतकऱ्यांनी संतप्त भावना व्यक्त करीत सचिवांना चांगलेच धारेवर धरत आमच्या पैसे द्या असे सांगितले तसेच बाजार समितीत एकाही व्यापाराच्या कागदपत्र जमा नसतांना व्यापाऱ्यांना मार्केटमध्ये माल खरेदी करू देतात कसे असा प्रश्न केला.

सचिव व शेतकऱयांत शाब्दीक वाद

तसेच एका बाजूला व्यापारी गुन्हा दाखल असून संबंधित व्यापारी दीपक पाटील यांच्यावर गुन्हा दाखल असून शेतकऱ्यांनी बाजार समितीत कांद्याचा लिलाव केला असल्याने पैसे देण्याची जबाबदारी ही बाजार समितीची आहे असे शेतकरी ठणकावून सांगत आमचे पैसे त्वरित द्या यामुळे सचिव व शेतकरी यांच्यात शाब्दिक गोंधळ उडाला सकाळी 11 वाजेपासून सायंकाळी उशिरापर्यंत शेतकरी बाजार समिती कार्यालयात बसून होते.

संपादन- भूषण श्रीखंडे