शासकीय खरेदी बंदमुळे शेतकऱ्यांची तारांबळ !  

विशाल रायते
Wednesday, 16 December 2020

खरेदी विक्रीच्या केंद्रावर नाव नोंदणी च्या ठिकाणी तासन्तास उभे राहून दोन पैसे जास्तीचे भेटतील या आशेपोटी शेतकऱ्यांची तळमळ होती.

न्याहळोद: न्याहळोद तसेच परिसरातील शेतकऱ्यांनी मका विक्रीसाठी तासन्तास उभे राहून विक्रीसाठी नेला असता शासनाचा टार्गेट पूर्ण झाला असून आता खरेदी बंद असल्याचे सांगून शेतकऱ्यांना माघारी पर्तविण्यात येत आहे, यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. 

आवश्य वाचा- अवकाळी पावसामुळे शेती पिकांवर आली अवकळा ! 
 

शासनाने नुकताच मका सह भरड धान्य खरेदी साठी मंजुरी दिली व शेतकऱ्यांना मका खरेदीचे मेसेज देखील पाठवले होते त्याअनुषंगाने शेतकरी वाहने घेऊन एमआयडीसी एरियात मका विक्रीसाठी नेला असता आमचा टार्गेट पूर्ण झाला असल्याचे सांगून शेतकऱ्यांना माघारी परतवून लावण्यात येत आहे. सगळे काम धंदे सोडून तलाठ्याकडे हेर झऱ्या मारून सातबारा उतारा काढून बँकेचे पासबुक, आधार कार्ड आदि कागदपत्र गोळा करून खरेदी विक्रीच्या केंद्रावर नाव नोंदणी च्या ठिकाणी तासन्तास उभे राहून दोन पैसे जास्तीचे भेटतील या आशेपोटी शेतकऱ्यांची तळमळ होती. आत्तापर्यंत बाराशे शेतकऱ्यांनी नाव नोंदणी केली असून फक्त तीनशे शेतकऱ्यांना पंक्तीत बसवले आहे बाकीच्यांना माघारी पाठवण्यात आले.

आवर्जून वाचा- आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर;  ड्रोन मशिनने उसावर फवारणी

त्यामुळे शेतकऱ्यांची हिरमोड झाली आहे. काही शेतकऱ्यांना मका विक्री आणण्यासाठी मेसेज आले आहेत परंतु तिथे गेल्यावर आमचा टार्गेट पूर्ण झाले असल्याचे सांगण्यात येत आहे आम्हाला वरून शासनाचे आदेशआले आहेत की मका घेऊ नये, पूर्ण महाराष्ट्राचा टारगेट साडेचार लाख टन इतका असून तो टार्गेट पूर्ण झाला असल्यामुळे मका खरेदी केंद्र बंद करण्यात आले आहे असे सांगण्यात येते, यामुळे शेतकऱ्यांनी करावे तर काय करावे? हा प्रश्न निर्माण झाला आहे. घाईगडबडीत महागड्या दराने मका काढून अवाजवी वाहन खर्च शेतकऱ्यांच्या बोकांडी बसत असल्याने यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक फसगत होत आहे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे. 

 

संपादन- भूषण श्रीखंडे

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule farmers stranded due to government procurement ban