वनविभागाच्या अधिकारी, कर्मचाऱयांनी श्रमदानातून एकाच दिवसात बांधला वनराईबंधरा ! 

धीलाजी जिरे
Monday, 26 October 2020

बांधात पाणी जमा झाले. त्या पाण्याचा पक्षी, प्राणी तसेच जमीनीत मुरण्यासाठी पाण्याचा उपयोग होईल.

वार्सा ः श्रमदानातून एखादी गोष्ट करणे  ते एकाच दिवसात पूर्ण करणे  असे फार क्वचित गोष्टी घडत असतात. पण बारिपाडा ता.साक्री येथील जंगलात वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी व अधिका-यांनी श्रमदानातून एकाच दिवसात त्बांयनी वनराई बंधारा बांधला.

डांगशिरवाडे बिटचे वनपाल भुषण वाघ, वनरक्षक दिपक भोई, योगेश भिल, देविदास भिल, गुलाब बारिस तसेच वनमजूर यांच्या प्रयत्नातून बारिपाडा जंगलात श्रमदानातून 12 मिटर लांब, दोन मिटर उंची, रूंदी एक मिटर या साईजचा मोठा वनराई बांध श्रमदानातून एका दिवसात पुर्ण करण्यात आला.यात सिमेंटच्या रिकाम्या गोण्यात वाळू भरून, दोन गोण्याच्या मध्ये माती टाकून तो बांध भक्कम करण्यात आला.

बारिपाडा जंगलातील कुचीदरा नाल्यांवर हा बांध बांधण्यात आला यावेळी चैत्राम पवार, भुषण वाघ, उत्तम पवार व वन कर्मचारी उपस्थित होते.
काही तासांतच त्या बांधात पाणी जमा झाले. त्या पाण्याचा पक्षी, प्राणी तसेच जमीनीत मुरण्यासाठी पाण्याचा उपयोग होईल. जंगलात असे बांध बाधंण्याची गरज असून हे बांध सध्या वाहून जाणाऱ्या पाण्याचा अटकाऊहोवून जमीनीत मुरल्याण्यास मदत होईल व भविष्यात त्याचा फायदाच होईल परिसरातील विहीरीना.  
 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule Forest officials and employees built the dam in a single day