धुळ्यात बालकांसाठी न्यूमोकोकल कॉन्जुगेट लस विनामूल्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

vaccine

धुळ्यात बालकांसाठी न्यूमोकोकल कॉन्जुगेट लस विनामूल्य


धुळे : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये (Corona third wave) लहान मुलांना (Small children) बाधा होण्याची शक्यता असल्यामुळे महापालिकेने (Dhule Municipal Corporation) लहान मुलांच्या उपचारासाठी व्यवस्था निर्माण केली आहे. यात न्यूमोनियामुळे बालकांचा मृत्यू होऊ नये म्हणून त्यांना न्यूमोकोकल कॉन्जुगेट लस (Pneumococcal conjugate vaccine) विनामूल्य देण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. या लसीकरण मोहिमेचा महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे (Department of Health)
जुन्या इमारतीच्या नागरी कुटुंबकल्याण केंद्रात मंगळवारी प्रारंभ झाला.( dhule municipal corporation small children free vaccination)


महापौर चंद्रकांत सोनार, अतिरिक्त आयुक्त नितीन कापडणीस, महिला बालकल्याण सभापती वंदना थोरात, आरोग्य अधिकारी डॉ. महेश मोरे, डॉ. पल्लवी रवंदळे, डॉ. प्रशांत पाटील, राकेश कुलेवार व परिचारिका आदी उपस्थित होते. न्यूमोनिया हा फुफ्फुसांना होणारा संसर्ग असून, यामुळे बालकांना श्‍वासोच्छवास करण्यास त्रास होतो. धाप लागणे, ताप आणि खोकला येणे अशी लक्षणे न्यूमोनियामध्ये दिसून येतात. हा आजार गंभीर स्वरूपाचा असेल तर बालकांचा मृत्यूही ओढावतो. या आजारापासून बालकांना सुरक्षित ठेवायचे असेल, तर नियमित लसीकरणांतर्गत न्यूमोनियाचे लसीकरणही करणे गरजेचे आहे. ही बाब लक्षात घेऊन महापौर सोनार आणि आयुक्त अजीज शेख यांनी शहरातील बालकांना न्यूमोकोकल कॉन्जुगेट लस विनामूल्य देण्याचा निर्णय घेतला आहे. खासगी रुगणालयामध्ये ही लस उपलब्ध असते. परंतु त्याची किंमत सरासरी सुमारे चार हजार रुपये आहे. अनेकांना हा खर्च परवडणारा नाही. त्यामुळे ही लस महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे बालकांना विनामूल्य दिली जाणार आहे. शहरातील अधिकाधिक पालकांनी बालकांसाठी या मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले.

vaccine

vaccine


तीन टप्प्यांत लसीकरण
एक वर्षाच्या आतील बालकांना तीन टप्प्यात ही लस दिली जाणार आहे. एक वर्षाच्या आतील बालकांना जन्मल्यापासून सहा आठवड्यांनी लसीचा पहिला डोस दिला जाणार आहे. पुढे १४ आठवड्यांनी दुसरा डोस, तर नऊ महिन्यांनंतर तिसरा डोस दिला जाणार आहे.

टॅग्स :Dhule corona news