esakal | धुळ्यात व्यापाऱ्यांना उपकर भरण्याविषयी नोटिसा
sakal

बोलून बातमी शोधा

धुळ्यात व्यापाऱ्यांना उपकर भरण्याविषयी नोटिसा

धुळ्यात व्यापाऱ्यांना उपकर भरण्याविषयी नोटिसा

sakal_logo
By
निखिल सुर्यवंशी

धुळे : कोरोनाचा (corona) संसर्ग रोखण्यासाठी अनेक निर्बंध आहेत. आजही धुळे शहर आणि जिल्ह्यात वीकेंड लॉकडाउन (Lockdown) आहे. आठवड्यातील पाच दिवसांत केवळ दुपारी चारपर्यंत व्यापार-उद्योगास (Trade-industry)मुभा आहे. अशा स्थितीत लहान-मोठा व्यापारी अडचणीत (Crisis) आला आहे. या पार्श्वभूमीवर व्यापाऱ्यांना कुठलीही नोटीस द्यायची नाही, असा निर्णय शासनाने घेतला आहे. तरीही धुळे महापालिका प्रशासन (Dhule Municipal Corporation) व्यापाऱ्यांना स्थानिक उपकर भरण्याविषयी नोटिसा देत (Tax notice)आहे. त्या त्वरित थांबवाव्यात, अशी मागणी व्यापारी महासंघाचे प्रवर्तक नितीन बंग यांनी केली.

(dhule municipal corporation tax notices were issued to traders)

हेही वाचा: पावसाअभावी पिके करपू लागली; दुबार पेरणीचे संकट!महापालिका प्रशासनातर्फे शहरातील व्यापाऱ्यांना उपकर भरण्याविषयीच्या नोटिसा दिल्या आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे. या पार्श्वभूमीवर व्यापारी महासंघाने प्रशासनास निवेदन दिले. याबाबत श्री. बंग यांनी सांगितले, की दोन महिन्यांपासून कोरोना संसर्गामुळे व्यापार-उद्योगावर निर्बंध आले आहेत. शनिवार आणि रविवारी व्यवसाय पूर्णतः बंद राहतो. इतर दिवशी दुपारी चारपर्यंतच मुभा आहे. व्यापार-उद्योगासाठी असलेला कालावधी ग्राहकांसाठी सोयीचा ठरत नाही. त्यामुळे शासनाच्या दप्तरी व्यापार-व्यवसाय सुरू असला तरी व्यापाऱ्यांच्या दृष्टिकोनातून पुरेशी उलाढाल होत नाही. अनेक व्यावसायिकांकडून अद्याप व्यवसायाचे परिक्षण झालेले नाही. पण त्याचवेळी महापालिका प्रशासनाने उपकर भरण्याविषयीच्या नोटिसा जारी केल्या आहेत.

हेही वाचा: बंधाऱ्यात बैलगाडी उलटून आतेभाऊ-मामेभाऊचा बुडून मृत्यू

दीड वर्षापासून कोरोना संसर्गामुळे व्यापार-उद्योग बंद आहेत. त्याचा एकूणच उलाढालीवर आणि उद्योग व्यवसायावर परिणाम झाला आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांकडून करआकारणी करण्याबाबत कुठलीही घाई नको, असा निर्णय शासनाने घेतला आहे. परंतु, महापालिका प्रशासन शहरातील व्यापाऱ्यांना उपकर भरण्याविषयीच्या मुदत घालून दिलेल्या नोटिसा देत आहे. मुदतीत जर उपकर भरला नाही, तर मोठ्या आकारात दंड वसूल केला जाणार आहे. त्यामुळे व्यापारी चिंताग्रस्त आहेत. महापालिकेने उपकर मागणीच्या नोटिसा देणे बंद करावे. परिस्थिती पूर्ववत झाली, की व्यापारी आणि उद्योजक उपकराचा भरणा करतील, असे स्पष्टीकरण श्री. बंग यांनी दिले.

loading image