esakal | धुळ्यात लसीकरणासाठी रांग

बोलून बातमी शोधा

vaccination line

धुळ्यात लसीकरणासाठी रांग

sakal_logo
By
टिम इ सकाळ

धुळे : शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाला असताना प्रतिबंधात्मक लसीकरण प्रभावशाली ठरत असल्याचे लक्षात आल्यावर प्रौढांसह ज्येष्ठींनी येथील साक्री रोडवरील जिल्हा शासकीय रूग्णालयात शनिवारी (ता. २४) मोठ्या रांगेव्दारे गर्दी केली. त्यातून जिल्हा, महापालिका, जिल्हा परिषद प्रशासन व आरोग्य यंत्रणेने प्रयत्नांती केलेली जनजागृती फलदायी ठरल्याचे दिसले.

लस आणि स्‍वॅब जवळजवळ

संसर्गजन्य कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात १६ जानेवारीपासून लसीकरण सुरु झाले. परंतु, त्याकडे अनेकांनी दुर्लक्ष केले. आता प्रतिबंधात्मक लसीचे महत्व लक्षात आल्यानंतर लसीकरणासाठी गर्दी होत आहे. जिल्हा रुग्णालयातील केंद्रांवर शनिवारी प्रौढांसह ज्येष्ठांची झुंबड उडाली. मात्र, दोन प्रकारच्या लस आणि स्वॅब देण्याची यंत्रणा जवळजवळ असल्याने कोरोनाचा फैलाव होऊ शकतो, अशी भिती व्यक्त करण्यात आली.

सकाळपासूनच गर्दी

कोरानापासून बचावासाठी ४५ वर्षांपुढील नागरिकांनी प्रतिबंधात्मक लस घ्यावी, असे आवाहन आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयात मोफत लसीकरण केले जात आहे. या रुग्णालयातील लसीकरणात दुसऱ्या मात्रेसाठी शनिवार आणि रविवार निश्चित करण्यात आला आहे. त्यानुसार शनिवारी सकाळी आठपासूनच गर्दी झाली. त्यात भारत इन्स्टिट्यूटची कोव्हॅक्सीन आणि सिरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड ही प्रतिबंधात्मक लस दिली जात आहे. जिल्हा रुग्णालयात या लस देण्यासाठी असलेल्या खिडक्या जवळजवळ आहेत. याच खिडकीजवळ प्राथमिक लक्षणे दिसल्यानंतर स्वॅब देण्यासाठी अनेक जण उपस्थित होतात.

लस देण्याच्या संख्येत मर्यादा पण..

प्रतिबंधात्मक लस देताना संख्येच्या मर्यादा आहेत. पण, संख्येची मर्यादा लक्षात न घेता लस घेण्यासाठी आलेल्यांची मोठी गर्दी आहे. त्यामुळे स्वॅब देणाऱ्यांची व्यवस्था इतरत्र झाली पाहिजे. तसेच गर्दी लक्षात घेता दोन लसींबाबत प्रक्रियेत अंतर असले पाहिजे. वाढते तापमान लक्षात घेता किमान सावली कशी राहिल याची काळजी रुग्णालय प्रशासनाने घेतली पाहिजे, अशी अपेक्षा लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांनी व्यक्त केली.