esakal | शिरपुर-शहादा महामार्गावरील खड्यांमुळे आठ दिवसांत तीन अपघात 
sakal

बोलून बातमी शोधा

शिरपुर-शहादा महामार्गावरील खड्यांमुळे आठ दिवसांत तीन अपघात 

शिरपूरहून शहादा कडे जात असलेल्या भरलेला ट्रकाची स्टेरिंग खड्ड्यांमुळे सैल झाले आणि वाहन चालकाचा ताबा सुटल्याने भामपूर येथील कठडे नसलेल्या पुलावर जाऊन आदळला.

शिरपुर-शहादा महामार्गावरील खड्यांमुळे आठ दिवसांत तीन अपघात 

sakal_logo
By
महेंद्र खोंडे

तऱ्हाडी ः  शिरपूर- शहादा या महामार्गावर गुजरात व मध्य प्रदेश या राज्यांमध्ये जाणाऱ्या अवजड वाहने मोठ्या प्रमाणावर वापर आहे. अवजड वाहनांमुळे मोठे खड्डे पडल्याने गेल्या आठ दिवसात तीन अपघात या महामार्गावर झाले आहे. त्यामुळे हे खड्डे जीवघेणे ठरत आहे.

चार दिवसांपूर्वी नागपूर येथुन गुजरात राज्यात संत्री भरलेला ट्रक हा भटाणे गावाजवळील कठडे नसलेल्या पुलावरीव खड्डे वाचवितांना वाहन चालकाचा वाहनावरील ताबा सुटलाने व पुलावर कठडे अडकले. थोडक्यात हा ट्रक अडकला. त्यात रविवारी दोन मोटरसायकलांचा खड्ड्यांमुळे अपघात झाला. तसेच आज सकाळी भामपूर गावाजवळील महामार्गावरील खड्डे असलेल्या पुलावर शिरपूरहून शहादा कडे जात असलेल्या भरलेला ट्रकाची स्टेरिंग खड्ड्यांमुळे सैल झाले आणि वाहन चालकाचा ताबा सुटल्याने भामपूर येथील कठडे नसलेल्या पुलावर जाऊन आदळला परंतु तो चालकाचा सावधान ते मुळे ट्रक अडकला.

महामार्ग बांधकाम विभागाचे दुर्लक्ष 

या महामार्गावरील पुल व रस्त्यात अनेक ठिकाणी मोठी खड्डे पडले आहे. परंतू या कडे महामार्गावर बांधकाम विभागाचे दुर्लक्ष केले जात आहे.  त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढल्याने नाहक नागरिकांचा जीव गमावावा लागत आहे. 

आठ दिवसात तीन अपघात

शिरपूर शहादा या महामार्गावर अवजड वाहनांमुळे मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहे. त्यामुळे वाहन चालक यांना वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागते आठ दिवसांत तीन अपघात झाले आहेत.