esakal | धुळेः चार लाखांचा गांजा जप्त, तिघे पोलिसांच्या जाळ्यात
sakal

बोलून बातमी शोधा

crime

धुळेः चार लाखांचा गांजा जप्त, तिघे पोलिसांच्या जाळ्यात

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

धुळे ः शहरातील चाळीसगाव रोड परिसरातून पोलिसांच्या (Police) विशेष पथकाने रिक्षासह चार लाखांचा गांजा जप्त (Cannabis seized) केला. या कारवाईत पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले मात्र दोन जण पसार झाले. या प्रकरणी चाळीसगाव रोड पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध (crime) गुन्हा दाखल करण्यात आला.

हेही वाचा: धुळ्यात तब्बल..साडेसात लाखांची ब्राउन शूगर जप्त


नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस उपमहानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर यांचे पथक व चाळीसगाव रोड पोलिसांच्या संयुक्त पथकाने रविवारी रात्री अडीचच्या सुमारास मुंबई-आग्रा महामार्गावर सापळा रचला. सर्व्हिस रोडलगत हॉटेल देश-विदेशच्या मागे (द्वारका लॉजजवळ) संशयित रिक्षा (एमएच ०५, बीजी ४२१८) पोलिसांनी पकडली. या रिक्षात गांजा मिळून आला. पोलिसांनी घटनास्थळावरून मोईनउद्दीन शहा सत्तार शहा (वय २९, रा. अजमेरानगर, खडीपट्टी, धुळे), राहुल बापू कुवर (वय २९, रा. दंडेवाला बाबानगर, मोहाडी उपनगर, धुळे) व बन्सीलाल रमेश गोसावी (वय २६, रा. तिखी रोड, शुभम नर्सरी मागे, मोहाडी) यांना ताब्यात घेतले.

हेही वाचा: धुळ्यात तब्बल..साडेसात लाखांची ब्राउन शूगर जप्त

दरम्यान, राजू शेख हसन शेख (रा. चौफुली रोड, धुळे) व अलीम शहा सत्तार शहा (रा. श्याम का मोहल्ला धुळे) हे दोघेही तेथून पसार झाले. कारवाईत सुमारे तीन लाख १५ हजार ८०० रुपये किमतीचा ६० किलो गांजा, ८० हजार रुपये किमतीची रिक्षा व पाच हजार रुपये किमतीचा मोबाईल असा एकूण चार लाख ८०० रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणी विशेष पथकातील हवालदार रामचंद्र परशुराम बोरसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाचही जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. विशेष पथकातील पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, बापू रोहम, सचिन जाधव, बशीर तडवी, नितीन सपकाळे, प्रमोद मंडलिक, मनोज दुसाने, सुरेश टोंगरे यांच्या पथकाने ही कारवाई केली. सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप पाटील तपास करीत आहेत

loading image
go to top