पोस्ट कोविडनंतर म्यूकॉरमायकोसिस जीवघेणा

म्यूकॉरमायकोसिस लागण संसर्गजन्य नाही म्हणजे एकापासून दुसऱ्याला, प्राण्यांपासून माणसाला त्याची लागण होत नाही.
पोस्ट कोविडनंतर म्यूकॉरमायकोसिस जीवघेणा



धुळे : शहरात विविध रुग्णालयांतून पोस्ट कोविड (covid) म्यूकॉरमायकोसिस (Mucormycosis) (कोविडनंतर आढळणारा बुरशीजन्य आजार) हा आजार असलेले रुग्ण मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. उपरोक्त आजार कोविड झाल्यानंतर बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांमध्ये आढळून येतो. हा आजार बुरशी (fungal infection) या जंतूंमुळे होतो. गेल्या महिन्याभरात एसीपीएम मेडिकल कॉलेजमध्ये (ACPM Medical College) कान-नाक-घसा विभाग तसेच दंतरोग विभागात या आजाराचे सुमारे ५५ रुग्ण दाखल झालेले आहेत. त्यातील ४९ रुग्णांवर यशस्वीपणे शस्त्रक्रिया (Surgery) करण्यात आलेली आहे. अद्याप सहा रुग्णांवर शस्त्रक्रिया होणे बाकी आहे.


(post covidial dangerous myocardial infarction)

पोस्ट कोविडनंतर म्यूकॉरमायकोसिस जीवघेणा
लवकर निदान, त्वरित उपचार हीच कोरोनावर मात करण्याची गुरुकिल्ली

या आजाराची सुरवात नाकापासून होते. मग टाळू, डोळे, तसेच मेंदूपर्यत तो पसरतो. म्यूकॉरमायकोसिस लागण संसर्गजन्य नाही म्हणजे एकापासून दुसऱ्याला, प्राण्यांपासून माणसाला त्याची लागण होत नाही. दरम्यान या आजारांवरील उपचारासाठी जवाहर मेडिकल फाउंडेशनच्या एसीपीएम मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलच्या कान-नाक-घसा विभागाचे विभागप्रुख डॉ. आर. व्ही. पाटील, डेंटल कॉलेजच्या ओरल मॅक्सिफेशियल सर्जरी विभागाचे विभाप्रमुख डॉ. बी. एम. रूडगी, प्रा. शरण बसप्पा प्रयत्न करीत आहेत. जवाहर मेडिकल फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. भाईदास पाटील, उपाध्यक्ष तथा आमदार कुणाल पाटील, सहसचिव संगीता पाटील, डॉ. ममता पाटील, अधिष्ठाता डॉ. विजय पाटील, डेंटलचे अधिष्ठाता डॉ. अरुण दोडामनी यांच्या सहकार्याने म्यूकॉरमायकोसिसच्या रुग्णांकरिता २० बेडचा स्वतंत्र विभाग सुरू करण्यात आलेला आहे.

या आजाराचे टप्पे
स्टेज १- नाकापर्यंत मर्यादित नाक व सायनसेस
स्टेज २ - डोळ्यांपर्यंत पसरणे
स्टेज ३ - मेंदूपर्यंत पसरणे

पोस्ट कोविडनंतर म्यूकॉरमायकोसिस जीवघेणा
धुळे मनपा सभेत मूलभुत समस्या सोडून..थेट सट्टा, दारू अड्ड्यांवर घसरली

धोका कोणाला?
अनियंत्रित मधुमेह, अवयव प्रत्यारोपण झालेल्या, स्टेरॉइड ड्रग्ज दिलेल्या, कोविड होऊन बरे झालेल्या रुग्णांना म्हणजे एकंदरीत ज्यांची रोगप्रतिकारकशक्ती कमकुवत आहे अशा लोकांना म्यूकॉरमायकोसिसचा जास्त धोका आहे.

लक्षणे कोणती?
नाकातला श्वास कोंडणे, काळ्या बुरशीचा चट्टा नाक, टाळू (हार्ड पॅलेट) येथे आढळणे, दात व गाल दुखणे व सुजणे, चेहऱ्याच्या हाडांना असह्य वेदना होणे, डोळा दुखणे व सुजणे, तसेच दृष्टी कमजोर होणे.

निदान कसे करावे
मौखिक तपासणी, सीटी स्कॅन, नाकाची इंडॉस्कॉपी व बायोप्सीच्या सहाय्याने आपण लवकर म्यूकॉरमायकोसिसचे निदान करू शकतो. त्यामुळे वरील लक्षणे आढळल्यास त्वरित आपण दंत व मुख्य आरोग्य विशेष तज्ज्ञ सल्ला घेणे आवश्यक आहे.

पोस्ट कोविडनंतर म्यूकॉरमायकोसिस जीवघेणा
जळगाव जिल्ह्यात संसर्गाची तीव्रता कमी,पण मृत्यूचे भय कायम !

उपचार काय?
कोविड झालेल्या रुग्णांनी सौम्य बिटाडीन नाकाचे ड्रॉप, तसेच नॉर्मल सलाइन, नसल स्प्रे दिवसातून तीन वेळा नाकात टाकल्यास आपण हा बुरशीचा आजार रोखू शकतो.
तातडीने निदान करून Antifungal therapy व संसर्ग शरीराच्या इतर अवयावापर्यंत पोचला असल्यास शस्त्रक्रिया करण्याची गरज पडू शकते.


कोविडमधून बरे झालेल्या रुग्णांनी आणि खासकरून मधुमेह आणि इतर आजार असलेल्या रुग्णांनी एकदा मुख आरोग्य तपासणी न चुकता करून घ्यावी. कोविडचे उपचार करणाऱ्या सर्व डॉक्टर्स सहकाऱ्यांनी मधुमेह असणाऱ्या रुग्णांना मुख आरोग्य तपासणी करण्याचा सल्ला द्यावा.
-डॉ. बी. एम. रूडगी, विभागप्रमुख,
ओरल मॅक्सिलोफेशियल सर्जरी, एसीपीएम दंतवैद्यकीय महाविद्यालय

(post covidial dangerous myocardial infarction)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com