चोरट्यांना शोधून दाखवा अन्‌ एक लाख रुपये बक्षीस घ्या 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 जानेवारी 2020

म्हसदी : येथे सातत्याने घडणाऱ्या चोरीच्या घटनांना व्यापाऱ्यांसह ग्रामस्थही वैतागले आहेत. पोलिसांकडून मात्र "तुम्हाला कोणावर संशय आहे का?' असा उफराटा प्रश्‍न विचारत ग्रामस्थांची बोळवण केली जाते. यामुळे पोलिस चोरट्यांचा अद्याप शोध घेऊ शकले नाहीत. आज पहाटे पुन्हा येथील पानटपरी चोरट्यांनी फोडल्यानंतर पोलिसांनी चौकशीचे सोपस्कार पार पाडले. यामुळे संतप्त किराणा दुकानदाराने "चोरट्यांना शोधून दाखवा अन्‌ एक लाख रुपये रोख बक्षीस घ्या', असे खुले आव्हानच दिले. यानंतर मात्र पोलिसांनी काढता पाय घेतला. 

येथील बसस्थानक परिसरात बुधवारी रात्री चोरट्यांनी अनिल कुवर यांच्या पानटपरीवर डल्ला मारत सुमारे तीस हजार रुपयांचे साहित्य लंपास केले. आज सकाळी ही घटना निदर्शनास येताच गजबजलेल्या परिसरात चोरी झाल्याने आश्‍चर्य व्यक्त झाले. गावात यापूर्वी शेकडो ठिकाणी चोऱ्या झाल्या. मात्र, एकाही चोरीचा पोलिसांना तपास लावता आला नाही. यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त झाला. सरपंच कुंदन देवरे, पोलिसपाटील पोपटराव देवरे यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिस कर्मचारी रोहन वाघ, महेश जाधव, तुषार बाविस्कर आदींनी भेट देत पंचनामा केला. यानंतर ग्रामस्थांनी यापूर्वी झालेल्या चोऱ्यांचा तपास का लागत नाही, असा सवाल पोलिसांना केला. चोरट्यांनी आतापर्यंत येथील किराणा दुकान, सायबर कॅफे, टेलर दुकानच काय तर कीटकनाशक विक्रीच्या दुकानावरही हात साफ केला आहे. चोरट्यांनी शिवलेले कपडे, किराणा, मोबाईल, कीटकनाशकेच नव्हे, तर मिठाच्या गोण्याही चोरून नेल्या. प्रत्येक वेळी पोलिसांत तक्रार करूनही चोरट्यांना पोलिस प्रतिबंध करू शकले नाहीत. या पार्श्वभूमीवर तब्बल चार वेळा ज्यांच्या दुकानात चोरी झाली ते किराणा दुकानदार विनोद प्रकाशचंद जैन यांनी आज येथील बसस्थानकात "चोरटे शोधून दाखवा अन्‌ एक लाख रुपये रोख बक्षीस घ्या' असे खुले आव्हानच पोलिसांनी दिले. यानंतर मात्र पोलिसांनी काढता पाय घेतला. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule raobry shop 1 lakh prize declear