"व्होट बॅंके'च्या मजबुतीसाठी नेत्यांची व्यूहरचना 

"व्होट बॅंके'च्या मजबुतीसाठी नेत्यांची व्यूहरचना 

लोकसभा निवडणुकीचा प्रचार निर्णायक वळणावर येऊन ठेपला आहे. प्रमुख भाजप- शिवसेना-रिपाइ महायुतीच्या उमेदवार डॉ. हीना गावित, कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेस महाआघाडीचे उमेदवार ऍड. के. सी. पाडवी, अपक्ष डॉ. सुहास नटावदकर आदींनी तालुका पिंजून काढला आहे. सोबत स्थानिक नेत्यांनीही प्रचारातून आपली "व्होट बॅंक' मजबूत करण्याकडे लक्ष केंद्रित केले आहे. याद्वारे आपापल्या उमेदवारांच्या मताधिक्‍याचे गणित नेत्यांनी आखले आहे. त्यासाठी तशी व्यूहरचना त्यांनी केल्याचे चित्र आहे. 
लोकसभेच्या नंदुरबार मतदारसंघातील निवडणुकीच्या मतदानास आता अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे सर्वच उमेदवारांनी प्रचाराला वेग दिला आहे. महायुतीच्या उमेदवार डॉ. हीना गावित व महाआघाडीचे उमेदवार ऍड. के. सी. पाडवी यांच्यातच दुरंगी दिसणारी लढत अखेरच्या टप्प्यात भाजपमधून बंडखोरी करत रिंगणात उतरलेले अपक्ष उमेदवार डॉ. सुहास नटावदकर यांच्यामुळे तिरंगी होण्याच्या स्थितीत येऊन ठेपली आहे. अशा वेळी मत विभाजनाचा फायदा कुणाला होतो व फटका कुणाला बसतो आणि आपापली "व्होट बॅंक' कशी सांभाळली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

महाआघाडीची व्होट बॅंक 
तालुक्‍यात विविध स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये असलेले वर्चस्व ही कॉंग्रेसची मुख्य "व्होट बॅंक' मानली जाते. यातच 20 वर्षांपासून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष शिवाजी दहिते यांनी सहकाऱ्यांह मतदारसंघात वर्चस्व राखतानाच मतदारसंघाची नव्याने मोट बांधली. सत्तेतून गावागावांत कार्यकर्त्यांची फळी उभारत "व्होट बॅंक' तयार केली. त्यांच्यासोबतच आमदार डी. एस. अहिरे, माजी खासदार बापू चौरे, बाजार समितीचे सभापती पोपटराव सोनवणे, नगराध्यक्ष ज्ञानेश्वर नागरे, तालुकाध्यक्ष विलास बिरारीस, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश चिटणीस सुरेश सोनवणे, तालुकाध्यक्ष जितेंद्र मराठे, प्रभाकर बच्छाव, उत्तमराव देसले, मधुकर बागूल, जिल्हा बॅंकेचे संचालक हर्षवर्धन दहिते, गणपत चौरे, उत्पल नांद्रे, प्रदीप नांद्रे, सचिन सोनवणे, हृषिकेश मराठे, श्रीराम कर्वे, किरण बच्छाव आदी नेत्यांनी प्रचारात अग्रभागी राहून उमेदवार ऍड. पाडवी यांना मताधिक्‍य मिळवून देण्यासाठी नियोजन केल्याचे चित्र आहे. 

महायुतीची व्होट बॅंक 
महायुतीच्या उमेदवार डॉ. गावित यांनी विविध योजनांच्या निमित्ताने तालुक्‍यात संपर्क ठेवण्याचा प्रयत्न केला. यातून "व्होट बॅंक' तयार करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. या बळावर पुन्हा एकदा मताधिक्‍य मिळविण्यासाठी त्यांनी प्रयत्न चालवले आहेत. सोबतच भाजपचे प्रांतिक सदस्य सुरेश पाटील, ऍड. संभाजी पगारे, जिल्हा सरचिटणीस वसंतराव बच्छाव, आदिवासी आघाडीचे मोहन सूर्यवंशी, तालुकाध्यक्ष संजय अहिरराव, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख भूपेश शहा, तालुकाप्रमुख विशाल देसले, विधानसभा संघटक पंकज मराठे, जिल्हा परिषद सदस्य विजय ठाकरे, पंचायत समिती सदस्य रमेश सरक, बापू गिते, डॉ. तुळशीराम गावित, महेंद्र देसले, प्रमोद गांगुर्डे, सचिन देसले, देगावचे माजी उपसरपंच सुधीर अकलाडे, ऍड. नरेंद्र मराठे, राजेंद्र खैरनार आदी नेत्यांनी गावागावांत मतदारांच्या गाठीभेटी घेत उमेदवाराला मताधिक्‍य मिळवून देण्यासाठी प्रयत्न केल्याचे दिसून येते. अपक्ष उमेदवार डॉ. नटावदकर यांनीही प्रचारातून नाराज मतदारांवर लक्ष केंद्रित केल्याचे दिसते. त्यांच्या प्रचारात "मोदी तुमसे बैर नाही.....', अशी घोषणा ऐकायला मिळत असल्याने रंगत निर्माण झाली आहे. त्यांच्या कन्या डॉ. समिधा प्रचारात उतरल्या आहेत. "व्होट बॅंके'सह जातीय समीकरणांची जुळवाजुळव करत प्रमुख उमेदवार प्रचारात गुंतले आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com