शिरपूर पोलिस ठाण्याबाहेर तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 Suicide Attempted

शिरपूर पोलिस ठाण्याबाहेर तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न


शिरपूर : शेळ्या चोरल्याच्या गुन्ह्यात पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलेल्या तरुणाने बुधवारी (ता. २२) सकाळी शहर पोलिस ठाण्याबाहेर (Police stations) विषप्राशन केले. त्याला धुळे येथे उपचारासाठी हलविले (Attempted suicide) आहे. मुबारक शब्बीर शाह (वय २५) असे या तरुणाचे नाव असून, तो शहरातील के. जी. मिल रोडवर राहतो.

हेही वाचा: धुळ्यात एमआयएमच्या आमदारांसह कार्यकर्ते ताब्यात


शहर पोलिसांनी शेळ्या चोरीच्या गुन्ह्यात दोन दिवसांपासून त्याची चौकशी सुरू केली होती. सकाळी पोलिस ठाण्यात आल्यानंतर काही वेळाने तो बाहेर गेला. सोबत आणलेले विषारी द्रव्य प्राशन केल्याने त्याला त्रास होऊ लागला. हा प्रकार लक्षात येताच नागरिकांनी त्याला उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. प्रथमोपचार करून त्याला धुळ्याला रवाना केले.


काय आहे प्रकार
मुबारक शाह टेम्पोचालक आहे. १७ सप्टेंबरला निमझरी रस्त्यावरील फार्ममधून १२ शेळ्या चोरीस गेल्या. त्या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले. संशयितांनी या गुन्ह्यात मुबारकचा सहभाग असल्याची माहिती दिली. त्यामुळे पोलिसांनी त्याला चौकशीसाठी बोलावले होते. गुन्ह्यात नाव गोवले जाण्याच्या भीतीने त्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे कळते. घटनास्थळी उंदीर मारण्याचे औषध बांधून आणलेली पुडी तसेच रॅटोक्स नावाची विषारी क्रीम आढळली.

हेही वाचा: ‘एटीएम’ने अनेकांची लावली लाॅटरी,आनंदात पार्टी मग पोलिसांची धास्ती

शेळ्या चोरीच्या गुन्ह्यात अटक केलेल्या संशयितांनी मुबारक शेख याने टेम्पोतून शेळ्यांची वाहतूक केल्याची माहिती दिली. खातरजमा करण्यासाठी त्याला पोलिस ठाण्यात बोलावले होते. पोलिस या संपूर्ण प्रकाराची चौकशी करीत असून, योग्य ती कार्यवाही केली जाईल.
-रवींद्र देशमुख, पोलिस निरीक्षक, शिरपूर

loading image
go to top