Dhule ZP Election:धुळे जिल्हा परिषदेवर भाजपची सत्ता कायम..

धुळे जिल्हा परिषदेत अमरिश पटेल यांचे वर्चस्व कायम असल्याचे दिसून आले.
Dhule ZP Election:धुळे जिल्हा परिषदेवर भाजपची सत्ता कायम..

जळगाव ः धुळे जिल्हा परिषदेवर भाजपची सत्ता असून धुळे जिल्हा परिषदेच्या झालेल्या पोटनिवडणूकीत भाजपनेच मुसंडी मारली असून भाजपने आठ जागा मिळवीत त्यांची सत्ता कायम ठेवली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसकने ३ जागा, काँग्रेस, शिवसेना यांनी प्रत्येकी दोन जागेवर विजय मिळवीला आहे. त्यामुळे भाजपची जिल्हा परिषदेवरील सत्ता कायम आहे.

धुळे जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणूकीसाठी काल मतदान झाले. ५८ टक्के झालेल्या मतदानामूळे सर्वच उमेदरवारांची धाकधुक वाढलेली होती. आज सकाळी दहा वाज्यापासून मतमोजणी प्रक्रियेला सुरवात झाली. यात अनेक ठिकाणी भाजपचे उमेदवार आघाडीवर आठ ठिकाणी भाजपचे उमेदवार निवडणून आले. त्यामुळे धुळे जिल्हा परिषदेत अमरिश पटेल यांचे वर्चस्व कायम असल्याचे दिसून आले.

तीन जागांवर भाजपचे नुकसान

भारतीय जनता पार्टीची धुळे जिल्हा परिषदेवर सत्ता असून १५ जागांवर झालेल्या निवडणूकीत मागील निवडणूकीच्या निकालानुसार तीन जागांवर भारतीय जनता पार्टीचे उमेदवर पराभातून झाल्याने नुकसान झाले आहे.

असे आहेत विजयी उमेदवार

भाजप (८ जागा)ः- धुळे तालुका- धरती देवरे (लामकानी), अश्‍विनी पवार (फागणे), राघवेंद्र पाटील (नगाव), संग्राम पाटील (कुसुंबा), आशुतोष पाटील (शिरूड), शिंदखेडा तालुका- महावीरसिंह रावल (मालपूर), सोनी कदम (खलाणे), संजीवनी शिसोदे (नरडाणा).

राष्ट्रवादी काँग्रेस (३ जागा)ः धुळे तालुका- किरण पाटील (कापडणे), मीनल किरण पाटील (मुकटी), शिंदखेडा तालुका- ललित वारूडे (बेटावद).

काँग्रेस (२ जागा) ः धुळे तालुका- आनंदा पाटील (नेर), मोतनबाई पाटील (बोरविहीर).

शिवसेना (२ जागा) ः- धुळे तालुका- शालिनी बाळासाहेब भदाणे (बोरकुंड, बिनविरोध), अनिता प्रभाकर पाटील (रतनपुरा).

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com