एकत्र येऊन धुळे जिल्‍ह्यात परिवर्तन करा- नाना पटोले

फडणवीस सरकारमुळे गरीब शेतकरी धर्मा पाटील यांना मंत्रालयात आत्महत्या करावी लागली
 Nana Patole
Nana Patole Nana Patole



दोंडाईचा ः काँग्रेस पक्ष (Congress) देश आणि राज्याला सांभाळू शकतो. त्यासाठी सर्वांनी एकत्र या आणि धुळे जिल्ह्यात परिवर्तन घडवा असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress state president Nana Patole)यांनी आढावा बैठकीत काँग्रेस कार्यकर्ताना केले. (congress meting state president nana patole instruction given to workers)

 Nana Patole
धुळ्यात शिक्षकांची ५० टक्के उपस्थिती शाळेत अनिवार्य!

गुरुवारी (ता. २४) येथे केले. येथील सौरभ मंगल कार्यालयात शिंदखेडा तालुका, दोंडाईचा शहर काँग्रेस कार्यकर्ता आढावा बैठक, कोरोनायोद्धा सन्मान व शेतकरी संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. आमदार कुणाल पाटील, आमदार प्रणिती शिंदे, प्रदेश उपाध्यक्ष भाई नगराळे, किसान काँग्रेसचे उपाध्यक्ष श्याम पांडे, माजी मंत्री डॉ. हेमंतराव देशमुख, प्रदेश सरचिटणीस विनायक देशमुख, राजाराम पानगव्हाणे, किसान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पराग पष्टे, माजी खासदार बापू चौरे, माजी आमदार डी. एस. अहिरे, प्रा. शरद पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्‍यामकांत सनेर, युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस राहुल माणिक, नाशिक जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, तालुकाध्यक्ष रावसाहेब पवार, नाना मराठे, प्रमोद मोरे, अतुल लोंढे, कुलदीप निकम, वसंत कोळी, राजेंद्र देशमुख, नंदू सोनवणे, रामभाऊ माणिक आदी व्यासपीठावर होते.

 Nana Patole
धुळे जिल्ह्यात केवळ 22 टक्के पेरणी

केंद्र सरकार कारणीभूत

श्री. पटोले म्हणाले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदी, जीएसटी, संविधान संपविण्याची व्यवस्था सुरू केल्याने त्यांच्या तोंडावर राजीनामा फेकला. फडणवीस सरकारमुळे गरीब शेतकरी धर्मा पाटील यांना मंत्रालयात आत्महत्या करावी लागली. कोरोना काळात अनेक गोरगरिबांच्या चिता जाळण्यासाठी केंद्र सरकार कारणीभूत आहे. रेमडेसिव्हिर इंजेक्शन, ऑक्सिजन यावर सर्व कंट्रोल केंद्र सरकारचा आहे. कोरोनामुळे अनेक उद्योगधंदे बंद पडले. बेरोजगारी वाढली. ओबीसी समाजाचे रोस्टर थांबविण्याचे काम फडणवीस सरकारने केले. ओबीसी आयोग बसविला नाही. भाजप नेहमी ओबीसींविरोधात राहिला. शेतकऱ्यांची संख्या ओबीसींत जास्त आहे. त्यांचे नुकसान करण्याचे काम हे सरकार ठरवून करीत आहे.
कोरोनायोद्धा म्हणून आशासेविका, अंगणवाडीसेविकांचा सत्कार नाना पटोले, प्रणिती शिंदे यांच्या हस्ते झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com