स्वॅब न देता घरी परतले, आणि दोन तासांत झाला मृत्यू !

रणजीत राजपूत
Monday, 14 September 2020

संबंधित व्यक्ती स्वॅब न देता निघून आल्यामुळे त्याच्याकडे ‘कोरोना’ संशयीत म्हणून पाहिले जाऊ लागले. मृताची पत्नी वगळता मुलगाही बाहेरगावी होता.

दोंडाईचा ः शिंदखेडा तालुक्यातील विखरण (देवाचे) येथील ‘कोरोना’ संशयीत वयोवृद्ध रुग्णाचा स्वॅब न देता घरी परतला असता दोन तासांनंतर मृत्यू झाला. यासंदर्भात सरपंच श्रीमती पवार यांनी प्रपोगंडा न करता डॉक्टर व तहसीलदारांना न कळविता मृताच्या नातेवाइकांना विश्वासात घेऊन पीपीई किट आणून स्थानिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले. सरपंचांच्या या निर्णयाने ग्रामस्थांनी स्वागत करून समाधान व्यक्त केले. 

विखरण (देवाचे) येथे विनायक पाटील नामक वयोवृद्ध उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाले. त्यांचे स्वॅब घेतले जाणार, हे समजल्यावर ते रुग्णालयातून घरी आले. त्यानंतर दोन तासांनंतर त्यांचा मृत्यू झाला. तेव्हा संबंधित व्यक्ती स्वॅब न देता निघून आल्यामुळे त्याच्याकडे ‘कोरोना’ संशयीत म्हणून पाहिले जाऊ लागले. मृताची पत्नी वगळता मुलगाही बाहेरगावी होता.

 

यावेळी गलीतील व शेजारील लोकांत भीती निर्माण झाली. घटनेबाबत तहसीलदार, मंडळ अधिकारी यांना कळवावे लागेल का? अशी तर्कवितर्काची चर्चा गावात रंगत असताना सरपंच अनिता पवार यांचे पती महेंद्र, मृताच्या भाऊबंदकीतील नातेवाइक, माजी सरपंच संजय पाटील यांनी तहसीलदार, रुग्णालयातील डॉक्टरांना घटनास्थळी बोलावून मृताचे स्वॅब देण्याचा प्रपोगंडा व प्रसिद्धीचा हव्यास न करता मृताच्या नातेवाइकांना विश्वासात घेऊन सरपंच पवार यांनी दोंडाईचाहून पीपीई किट मागवले. ते चार जणांनी घालून मृतदेह पीपीई किट गुंडाळून ट्रॅक्टरमध्ये ठेवले, तसेच ट्रॅक्टरचालकालाही किट घालून बसवले व स्मशानभूमीत मृताच्या मुलीने अग्नी देत अंत्यसंस्कार केल्याने चर्चेला विराम मिळाला.  

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dondaicha Corona returned home without suspecting the patient, and died within two hours