शेतकऱ्यांच्या मनधरणीसाठी मंगळवारी नगरपरियोजना आराखडा सादरीकरण

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 मे 2019

शेतकऱ्यांसमोर मंगळवारी नगरपरियोजना आराखडा होणार सादर 
नाशिक- दिड महिन्यांच्या कालावधीनंतर धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी होणाऱ्या महासभेच्या पुर्वसंध्येला शेतकऱ्यांसमोर स्मार्ट सिटीअंतर्गत नगरपरियोजनेचा आराखडा सादर करण्याचा निर्णय स्मार्ट सिटी कंपनीने घेतला आहे. येत्या मंगळवारी (ता. 28) सकाळी अकराला कालिदास कलामंदीर मध्ये आराखडा सादर केला जाणार आहे.

स्मार्ट सिटी अंतर्गत नगरपरियोजना राबविली जाणार आहे त्यासाठी पंचवटी विभागातील मखमलाबाद व हनुमानवाडी परिसरात 754 एकर जागा निश्‍चित करण्यात आली आहे. शेतकयांचा सुरुवातीला विरोध होता त्यानंतर मात्र अहमदाबाद मॉडेल बघितल्यानंतर शेतकऱ्यांची किमान ऐकण्याची मानसिकता झाली. अहमदाबादप्रमाणे विकासाचे 60-40 प्रमाण ठेवण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली होती. पण किमान जागेचे सर्वेक्षणाला विरोध करू नका अशी विनंती स्मार्ट सिटी कंपनीकडून करण्यात आली. त्यानुसार जागेचे सर्वेक्षण झाले. जागा मालकांना अधिक मोबदला देण्यासाठी आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी तीन प्रस्ताव सादर केले होते. पण शेतकऱ्यांपर्यंत ते प्रस्ताव पोहोचले नाहीत. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news farmer land problem