esakal | राहुड घाटात तिहेरी अपघात; गॅस टँकर गळती टळली
sakal

बोलून बातमी शोधा

live

राहुड घाटात तिहेरी अपघात; गॅस टँकर गळती टळली

sakal_logo
By
हर्षल गांगुर्डे

गणुर - मुंबई आग्रा महामार्गावर चांदवड नजिक राहुड घाटात ट्रक, पिकअप, गॅस टँकर यांचा आज रात्री साडेनऊच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात कुणीही गँभिर जखमी, मृत नसले तरी तिन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

चांदवड कडून मालेगावच्या दिशेने जाणारा ट्रक अनियंत्रित होऊन तो पुढील पिकअप व नंतर गॅस टँकर वर आदळला. हा अपघात इतका भीषण होता की यात तिनही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान अपघातात कुणीही गँभिर नसले तरी टँकर मधून गॅस गळती न झाल्याने मोठा अनर्थ टळला.

वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने तीनही वाहनांचे क्रमांक समजू शकले नाही. घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक विशाल सणस व चांदवड पोलिसांनी धाव घेत महामार्गावरील खोळंबलेली वाहतूक सुरळीत करण्याचा उशिरा पर्यंत प्रयत्न करत होते. किरकोळ जखमींना चांदवड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून घटनेचा अधिक तपास चांदवड पोलीस करीत आहेत.

loading image
go to top