
पंकजा मुंडे व ऍड,रोहिणी खडसे यांना पक्षातर्गत कोणीही पाडलेले नाही. पक्षात असा पाडापाडीचा प्रकार केला जात नाही. मुक्ताईनगर मतदार संघात एकनाथराव खडसे गेल्यावेळी फारश्या मोठ्या मताधिक्यांने निवडून आलेले नाहीत,यावेळी त्या मतदार संघात ते उमेदवार नव्हते,त्यांच्या कन्या ऍड.रोहिणी खडसे यांना उमेदवारी दिली.
जळगाव : पक्षात कोणीही उमेदवारांना अंतर्गत पाडापाडी करण्याचे उद्योग करीत नाही. ऍड.रोहिणी खडसे, पंकजा मुंडे यांना पाडल्याचा माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचा आरोप चुकिचा आहे. त्यांच्याकडे पुरावा असेल तर त्यांनी नावेच जाहिर करावी असे अवाहन माजी मंत्री व पक्षाचे नेते गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषदेत बोलतांना केले.
जळगाव येथे तापी महामंडळाच्या विश्रामगृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलतांना ते म्हणाले, कि पंकजा मुंडे व ऍड,रोहिणी खडसे यांना पक्षातर्गत कोणीही पाडलेले नाही. पक्षात असा पाडापाडीचा प्रकार केला जात नाही. मुक्ताईनगर मतदार संघात एकनाथराव खडसे गेल्यावेळी फारश्या मोठ्या मताधिक्यांने निवडून आलेले नाहीत,यावेळी त्या मतदार संघात ते उमेदवार नव्हते,त्यांच्या कन्या ऍड.रोहिणी खडसे यांना उमेदवारी दिली. त्याच्या विरोधात शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत पाटील उभे राहिले.ते प्रत्येक वेळी विरोधात उभे राहिले आहेत. यावेळी त्यांना शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसचा पाठींबा मिळाला.त्यामुळे रोहिणी खडसेंना पराभव पत्करावा लागला. मात्र यावेळीही खडसे उमेदवार असते. तर निवडून आले असते, परंतु पक्षाने खडसे यांना उमेदवारी दिली नाही.मात्र पक्षातून अतंर्गत त्यांना पाडण्यात आले हा आरोप पूर्णपणे चुकिचा आहे.त्यांच्याकडे जर पुरावा असेल त्यासह पाडापाडी करणाऱ्याची नावे जाहिर करावीत. पक्षात अंतर्गत उमेदवाराच्या पाडापाडीचा उद्योग कोणीही करीत नाहीत.
पक्षातून कोणीही फुटणार नाहीत.
पक्षातून बारा आमदारांचा गट फुटणार असल्याच्या चर्चेबाबत बोलतांना ते म्हणाले, पक्षातून कोणीही फुटणार नाही या सर्व अफवा आहेत. पंकजा मुंडे यांनी तर बंडखोरी रक्तात नसल्याचेच जाहिर केले आहे. त्यामुळे त्यांच्या पक्षांतराचा प्रश्नच नाही.