यंदाचे गिरणा गौरव पुरस्कार जाहीर 

खंडु मोरे 
रविवार, 14 जानेवारी 2018

खामखेडा (नाशिक) - साहित्य, सहकार, सामाजिक, शैक्षणिक, आौद्योगिक, कला, नाट्य, पत्रकारीता, अधिकारी आदी क्षेत्रात महाराष्ट्रात विशेष योगदान देणाऱ्या गुणवंतांना गिरणा गौरव पुरस्कार हा उत्तर महाराष्ट्राचा मानाचा समजला जाणारा स्तंभ देऊन सन्मानित करण्यात येते.

खामखेडा (नाशिक) - साहित्य, सहकार, सामाजिक, शैक्षणिक, आौद्योगिक, कला, नाट्य, पत्रकारीता, अधिकारी आदी क्षेत्रात महाराष्ट्रात विशेष योगदान देणाऱ्या गुणवंतांना गिरणा गौरव पुरस्कार हा उत्तर महाराष्ट्राचा मानाचा समजला जाणारा स्तंभ देऊन सन्मानित करण्यात येते. यंदा गिरणा गौरव प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारा गिरणा गौरव पुरस्कार सामाजिक कार्यासाठी जेष्ठ समाजसेविका गौरी सावंत (मुंबई), संवाद लेखक निर्माता दिग्दर्शक अरविंद जगताप (औरंगाबाद), बचत गटातून महिलांसाठी योगदान देणाऱ्या अश्विनी बोरस्ते (नाशिक), सहकार वसांस्कृतिक क्षेत्रात काम करणारे विश्वास ठाकुर (नाशिक), अनेक गुन्ह्याचा तपास करुन आदर्श निर्माण करणाऱ्या सरकारवाडा पोलिस स्टेशनच्या पोलिस अधिकारी सरिता आहिरराव  यांच्या सह ५ जणांना जाहीर करण्यात आला. अशी माहिती गिरणा गौरव प्रतिष्ठानचे मार्गदर्शक आनंद अॅग्रोचे चेअरमन उद्धव आहेर, निवड समितीचे अध्यक्ष विश्वास देवकर यांनी दिली. 

येत्या ५ एप्रिल रोजी नाशिक येथील रावसाहेब थोरात सभागृहात मान्यावरांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार असल्याची माहिती निवड समितीच्या वतीने देण्यात आली. निवड समितीच्या झालेल्या बैठकीत या पुरस्काराची घोषणा करण्यात आली असून मानपत्र, स्मृतीचिन्ह, महावस्र असे या पुरस्काराचे स्वरुप असेल. या पुरस्काराचे हे २० वे वर्षे आहे. यावेळी निवड झालेल्यांमध्ये संवाद लेखक अरविंद जगताप, समाजसेविका गौरी सांवत, अश्विनी बोरस्ते, पोलिस अधिकारी सरीता आहिरराव, डॉ. तानाजी वाघ (कळवण), सहकार विश्वास ठाकुर, दुग्धउद्योजक समाधान हिरे (मालेगाव), दैनिक सकाळचे पत्रकार छायाचित्रकार सोमनाथ कोकरे (नाशिक), शेती-पर्यावरण-अध्यात्म याविषयी कार्य असलेले कृष्णा भामरे (सटाणा), शैक्षणिक गट विकास अधिकारी डॉ. सरोज जगताप (निफाड) यांच्यासह नाशिक येथील लायन्स कल्ब नाशिक या संस्थेची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. आनंद अॅग्रोचे चेअरमन उद्धव आहेर, विश्वास देवकर, साहेबराव गायकवाड, बाळासाहेब देवरे, सतिष देसले, गिरजा गावीत, डॉ. मोहन गिरी, अशोक चौधरी या निवड समितीने या पुरस्काराचे कामकाज पाहून घोषणा केली.

Web Title: marathi news girna award declared for this year