esakal | गोंदे दुमाला येथील तिहेरी अपघातात तीन जण जागीच ठार, दोनजण गंभीर
sakal

बोलून बातमी शोधा

live

गोंदे दुमाला येथील तिहेरी अपघातात तीन जण जागीच ठार, दोनजण गंभीर

sakal_logo
By
ज्ञानेश्वर गुळवे,सकाळ वृत्तसेवा

अस्वली स्टेशन- नाशिक-मुंबई महामार्गावर गोंदे दुमाला येथील प्रभू ढाब्याजवळ इनोव्हा, पिकअप व ट्रक यांच्यात  काल रात्री झालेल्या  अपघातात तीन जण जागीच ठार झाले.काहीजण गंभीर जखमी आहे. वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

  नाशिकहून मुंबईच्या दिशेने जाणारी इनोव्हा गाडी क्र.MH-15 DC 7160 चालकाचे नियंत्रण सुटल्याने दुभाजकावरून पलीकडील मुंबईहून नाशिककडे जाणाऱ्या पिकअप वर जावून आदळली,त्याच दरम्यान मागुन येणारी ट्रक क्र.MP-09 MM 7659 अनियंत्रित होऊन तो अपघातग्रस्त पिकअपवर जावून आदळला हा अपघात इतका भीषण होता की यात इनोव्हा गाडीतील तीन जणांच्या शरीराचे छिन्न विच्छिन्न तुकडे झाल्याने जागीच ठार झाले.
प्रफुल्ल धनंजय प्रभू (वय २४), रोहित शिवाजी पवार (वय २५), जावेद जमायूद्दीन सिद्धिकी( वय२७) सर्व नाशिकचे रहिवासी आहे. तीन गंभीर जखमी झाले आहेत. नरेंद्रनाथ संस्थानच्या रुग्णवाहिकेचे चालक निवृत्ती गुंड यांनी तात्काळ जखमींना नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहेत. तिन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान वाडीवऱ्हे पोलीस स्टेशनचे निरीक्षक सुहास देशमुख घटनास्थळी धाव घेत महामार्गावरील खोळंबलेली वाहतूक सुरळीत करण्याचा  प्रयत्न केला.घटनेचा अधिक तपास पोलीस हवालदार परदेशी करीत आहेत.

loading image
go to top