गेला मध काढायला... अन्‌ तळीरामाने चोरली दारु

गेला मध काढायला... अन्‌ तळीरामाने चोरली दारु
Updated on

चाळीसगाव: शहरातील बंद असलेल्या उघड्या बियर बारच्या शेजारील झाडावर मध काढण्यासाठी चढलेल्या एकाची नजर बारमधील दारुच्या बाटल्यांवर पडली आणि मध काढायचे सोडून दारुच्या बाटल्या चोरण्याचा विचार त्याच्या मनात आला. आपल्या दोघा सहकाऱ्यांच्या मदतीने त्यांनी बारमधील दारुच्या बाटल्या चोरल्या. मात्र, चोरीचा हा प्रकार लक्षात आल्यानंतर तिघा चोरट्यांना पोलिसांनी मोठ्या शिताफीने पकडले. या तिघांच्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शहरातील चौधरी वाड्यातील रहिवासी दीपक चौधरी यांनी सुमारे तीन वर्षांपासून शहरातील टाकळी प्र. चा. भागातील आतमध्ये मोकळी जागा असलेली हॉटेल हसतखेळत ही भाडेतत्त्वावर चालवायला घेतली आहे. या हॉटेलला देशी, विदेशी दारूचा परवाना आहे. सध्या ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’ असल्याने २० मार्चपासून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार हॉटेल बंद आहे. या हॉटेलमध्ये देशी, विदेशी दारू व बिअरच्या बाटल्या फ्रिजमध्ये ठेवण्यात आलेल्या होत्या. हॉटेल बंद असल्याने दीपक चौधरी हे आज हॉटेलची सहज म्हणून बाहेरून पाहणी करण्यासाठी गेले होते. त्यांना हॉटेलच्या पश्चिम बाजूचे शटर उचकवलेले दिसले. त्यामुळे त्यांनी हा प्रकार पोलिसांना कळवला. पोलीस आल्यानंतर हॉटेलमध्ये पाहणी केली असता, सुमारे ३२ हजारांच्या विविध कंपन्यांचे बिअरचे बॉक्स चोरीला गेल्याचे लक्षात आले. त्यानुसार, पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवली व बिअरच्या बाटल्यांवर डल्ला मारणाऱ्या गौतम बबन जाधव, मुकेश रोहिदास दळवी व भुरा आनंदा मोरे (तिघेही रा. टाकळी प्र. चा.) यांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पुढील तपास साहाय्यक फौजदार बापूराव भोसले करीत आहेत. 

तीन दिवसांपासून चोरी 
पोलिसांनी ताब्यात घेतलेले तिघे संशयित हातमजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात. बऱ्याचदा ते झाडावरील मधाचे पोळ काढून त्यातील मध देखील विकतात. हॉटेल हसतखेळतच्या बाजूला असलेल्या एका झाडावरील मधाचे पोळ काढण्यासाठी ते झाडावर चढले असता, हॉटेलमध्ये प्रवेश करण्यासाठी जागा मोकळी असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी नामी शक्कल लढवून झाडावरून भिंतीवर उडी घेऊन हॉटेलमध्ये प्रवेश केला. तीन, चार दिवसांपासून त्यांचा बियर चोरण्याचा हा उपक्रम सुरू होता. हॉटेलमधील बिअरचा साठा संपल्याने चोरट्यांनी इतर दारू लंपास करणे सुरु केले होते. मात्र, पोलिसांनी त्यांचा हा प्रकार हाणून पाडला. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com