भाषा संचालनालयाचे 'शासन शब्दकोश' अॅप

वैभव तुपे
सोमवार, 26 मार्च 2018

तळेगाव : मराठी भाषेचा वापर अधिकाधिक वाढावा आणि शासकीय कामकाजात वापरल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या इंग्रजी आणि मराठी शब्दांचा अर्थ शोधणे सोपे व्हावे या उद्देशाने भाषा संचालनालयाने अँड्रॉइड मोबाईलवर वापरता येण्याजोगे अॅप तयार केले  आहे. याद्वारे 'शासकीय भाषा' समजून घेणे आता सर्वसामान्य नागरिकांनाही सहज शक्य होणार आहे. 

तळेगाव : मराठी भाषेचा वापर अधिकाधिक वाढावा आणि शासकीय कामकाजात वापरल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या इंग्रजी आणि मराठी शब्दांचा अर्थ शोधणे सोपे व्हावे या उद्देशाने भाषा संचालनालयाने अँड्रॉइड मोबाईलवर वापरता येण्याजोगे अॅप तयार केले  आहे. याद्वारे 'शासकीय भाषा' समजून घेणे आता सर्वसामान्य नागरिकांनाही सहज शक्य होणार आहे. 

रोजच्या व्यवहारात वापरल्या जाणाऱ्या इंग्रजी शब्दांचे मराठी अर्थ आणि मराठी शब्दांचे इंग्रजी अर्थ आणि पर्यायी शब्द सहज उपलब्ध व्हावेत यासाठी भाषा संचालनालयाकडून या अॅपची निर्मिती करण्यात आली आहे. माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात वेगाने होणारी प्रगती लक्षात घेता इंटरनेटवर मराठी भाषेचा वापर सुद्धा तितक्याच वेगाने वाढायला हवा या उद्देशाने शासन शब्दकोश भाग 1 हे अॅप तयार करण्यात आले आहे. सध्या जवळपास बहात्तर हजार शब्द आणि साडेसातशे अधिनियम या मध्ये उपलब्ध आहेत.

मे 1973 मध्ये पहिला शासन शब्दकोश तयार करण्यात आला होता. त्यानंतर शासकीय व्यवहारात मराठीचा वापर खऱ्या अर्थाने वाढू लागला. त्यानंतर नवे शब्द, नव्या परिभाषा यांनी मराठी भाषा समृद्ध होत गेली. सध्या वापरात असलेल्या अनेक शासकीय शब्दांना या कोशाद्वारे नवे पर्यायी शब्द उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या अॅपची रचनाचणी वापर दोन्ही सोपे असून एकदा डाऊनलोड केल्यानंतर हे अॅप इंटरनेट शिवाय ऑफलाईन सुद्धा वापरता येणार आहे. यामध्ये इंग्रजी-मराठी आणि मराठी-इंग्रजी पद्धतीने शब्दांचे अर्थ पाहता येणार आहेत.

"शासन व्यवहारातली भाषा सामान्य लोकांपर्यंत सहज पोहोचावी यासाठी या अॅपचा वापर करता येणार आहे, केवळ शासकीय व्यवहारातच नव्हे तर एकूणच कामकाजात मराठीचा वापर वाढवणे आवश्यक आहे. जुन्या शासकीय दस्तऐवजांचे युनिकोडिंग करण्यासाठी सुद्धा शासन स्तरावरून ठोस प्रयत्न होणे गरजेचे असून ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान यासाठी नेहमीच प्रयत्नशील आहे." 
- सुचिकांत वनारसे (संगणक अभियंता) 
अध्यक्ष, ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान 
 

Web Title: marathi news govt app