पावसानं सगळं नेलं,तरी थांबुन कसं चालंल....

भाऊसाहेब गोसावी - सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 नोव्हेंबर 2019

निमोण - मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा
पाठीवरती हात ठेउन, फक्‍त लढ म्हणा’! खरंच बळीराजात निसर्गाशी दोन हात करण्याचं एवढं बळ कुठून येतं माहीत नाही.शुक्रवारच्या पावसानं निमोण येथील पंढरीनाथ पुंडलिक देवरे यांची दोन एकर शेती काढणीला आलेल्या कांदा पीकासह वाहुन नेली.जमीनीत मातीच ठेवली नाही.पाण्यानं खडक उघडा केला.या अस्मानी संकटात देखील या साठीत आलेल्या शेतकऱ्यानं धीर सोडला नाही.वयाच्या पन्नाशी पर्यंत अपार कष्ट करून जी जमीन तयार केली तीच डोळ्यांदेखत वाहुन गेली. आता घरची जमीन राहीली नाही म्हणून थांबायचं नाही.गेलेलं पुन्हा उभं करायचं निसर्गाशी पुन्हा दोन हात करायचे.

       जिगरबाज शेतकऱ्यानं शेजारचे शेतकरी शांतीलाल ललवाणी यांची जमीन  वाट्यानं घेतली. ललवाणी यांनी देखील मनाचा मोठेपणा दाखवून या अत्यंत गरीब व कष्टाळू शेतकऱ्याला धीर दिला.अनेकांनी त्यांना लढण्याचं बळ दिलं  अनं त्यांनी आज लगेचच पुन्हा उभं राहून तीची नांगरट करायला सुरुवात केली. या वयात नव्यानं रान हिरवं करण्याचं स्वप्न घेऊन त्यांच चार जनांचं कुटुंब पुन्हा उभं राहिलं‌.त्यांची पत्नी जिजाबाई, मुलगा गोरखनाथ व सुन सोनाली हे त्यांच्या बरोबर उभे राहिले अन् त्यांना देखील धीर आला.

 वडीलोपार्जित साडेतीन एकर जमीन.यापैकी तीन एकरात कांद्याची लागवड केली होती.त्यातंले दोन एकर कांदा पीकासह वाहुन गेलं.उरलेले दिड एकर कांदे सुद्धा नष्ट झाले आहे.जमीनीचा खडक उघडा पडला.सत्तर फुट विहीर बुजली.पाइपलाईन वाहुन गेली.जनावरांना चारा राहीला नाही.प्यायला पाणी नाही.अशा अवस्थेत त्यांना शासनाने भरीव मदत करुन जगण्याचं बळ द्यायला हवं.

झालेली हानी
दोन एकर शेतीतील वाहुन गेलेली माती - चार लाख रुपये
दोन हजार फूट पाइपलाइन - दिड लाख रुपये
सत्तर फुट विहीर बुजली -  दोन लाख रुपये
काढणीला आलेलं वाहुन गेलेलं कांदा पीक दोन एकर -  आजच्या बाजार भावा नुसार नुकसान - दहा लाख रुपये
दिड एकर खराब झालेले कांदा पीक - तीन ते चार लाख रुपये
एकुण अंदाजे नुकसान - एकवीस लाख रुपये

 उभं आयुष्य घाम गाळून जमीन तयार केली होती.रक्तांचं पाणी करुन शेती फुलवली होती.शुक्रवारची ती रात्र आमच्यासाठी काळरात्र ठरली.त्या पावसानं व्हत्याचं नव्हतं केलं.आता या वयात बळ नाही राहीलं.मनात खूप वाईट इचार येतो .पण लेकरं डोळ्यामोरं येत्यात.आता मायबाप शासनांच काही तरी करावा..
   पंढरीनाथ देवरे.निमोण

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news GROUND REPORT