इगतपुरी परिसरात आवणीला प्रारंभ

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 10 July 2019

तळेगाव : इगतपुरी तालुक्यात पावसाने यंदा उशीरा हजेरी लावली असली तरी सध्या पेरणीच्या दृष्टीने समाधानकारक पाऊस झाला असल्याने भातशेतीच्या दृष्टीने सर्वत्र शेतीकामांची लगबग सुरू झालेली दिसत आहे.

उशिराने सुरू झालेल्या कामांची कसर भरून काढत शेतकरी बांधव आवणीच्या तयारीला लागले असून सध्या सर्वत्र आवणीची लगबग पाहायला मिळते आहे. यंदा प्रथमच सात जूनचा मुहूर्त पावसाने टाळला होता, त्यामुळे शेतकरी धास्तावला होता, मात्र उशिरा का असेना समाधानकारक पावसाला सुरुवात झाल्याने शेतकरी बांधव उत्साहाने आवणीच्या तयारीला लागलेले दिसत आहेत. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news igatpuri avni