जळगाव जिल्ह्यात आज वीस कोरोना बाधित रूग्ण आढळले 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 मे 2020

जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 317 इतकी झाली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाला कोरोना प्रादुर्भाव कसा रोखावा असा प्रश्‍न आता पडला आहे. 

जळगाव ः जळगाव जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना बाधीत रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यात जळगाव शहरासह, भुसावळ, चोपडा, धरगाव येथे रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यात जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या कोरोना संशयीत व्यक्तिंचे घेतलेल्या स्वॅबचे आज अहवाल प्राप्त झाले. त्यात 22 व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असून वीस व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. 

नुकताच मिळालेल्या अहवालत पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये धरणगावचे सात, भुसावळ येथील चार, चोपडा येथील एक, यावल तालुक्‍यातील दोन, सावदा येथील गांधी चौकातील दोन तर जळगाव शहरातील पोलीस कॉलनीतील दोन, सिव्हील हॉस्पिटलमधील एक रुग्णाचा समावेश आहे. तसेच यापूर्वी कोरोना बाधित असलेल्या भुसावळ, अमळनेर व जळगाव येथील प्रत्येकी एका रुग्णांचे पुर्नतपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 317 इतकी झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 110 रुग्ण कोरोनामुक्त होवून घरी गेले आहे. तर 37 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी दिली. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jagaon distrik 20 corona patients report positive