Loksabha 2019 : उज्ज्वल भारतासाठी मोदीच पंतप्रधान व्हावेत! : उन्मेष पाटील

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 13 एप्रिल 2019

पाचोरा : भविष्यातील उज्ज्वल भारत घडविण्यासाठी मोदी पुन्हा पंतप्रधान झाले पाहिजेत. त्यासाठी भाजपला मत द्या, असे आवाहन लोकसभेच्या जळगाव मतदारसंघातील भाजप-शिवसेना, मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार उन्मेष पाटील पाटील यांनी केले. पाचोरा तालुक्‍यात त्यांनी आज युवकांशी संवाद साधला. 
तालुक्‍यातील प्रचार दौऱ्याला लोहटार येथून सुरवात झाली. शेकडो नागरिक, माताभगिंनींनी गावाच्या प्रवेशद्वाराजवळ त्यांच्या स्वागतासाठी गर्दी केली होती. त्यांनी तरुण, महिला, ज्येष्ठ नागरिकांच्या गाठीभेटी घेत समस्या जाणून घेतल्या. 

लोहटार, राणीचे बांबरुड, लासगाव, सामनेर, नांद्रे, माहेजी, कुरंगी येथील रॅलीमध्ये ग्रामस्थांसह नेते, पदाधिकारी घरोघरी फिरून नागरिकांना पंतप्रधान मोदींना मतदान करण्याचे आवाहन करीत होते. यावेळी स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. रॅलीमध्ये बाजार समितीचे सभापती सतीश शिंदे, भाजपचे ज्येष्ठ नेते सदाशिव पाटील, जळगाव महानगर सचिव दीपक सूर्यवंशी, डी. एम. पाटील, जिल्हा परिषदेचे सदस्य पद्मसिंह पाटील, जिल्हा परिषद सदस्य मधुकर काटे, युवा नेते अमोल शिंदे, भाजप तालुकाध्यक्ष सुभाष पाटील, शहरप्रमुख नंदू सोमवंशी, शिवसेनेचे माजी उपनगराध्यक्ष गणेश पाटील, दादू वकील, माजी सभापती अनिल पाटील, शिवसेनेचे तालुकाप्रमुख शरद पाटील, पंढरी पाटील, गोविंद शेलार, वैभव पाटील, विकी देशमुख, राजेंद्र पाटील, रवींद्र देशमुख, किशोर आढाव, वैभव टेमकर, साधना देशमुख, सुनील काटे, राजू तायडे, सुनील पाटील, राजू पाटील, अमोल महाले, जितू पाटील, राजू पाटील, साळुंके आदींसह गट-गणप्रमुख, शक्तिकेंद्र प्रमुख, बुथप्रमुख, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी चेअरमन, संचालक, तालुका व जिल्हा युवामोर्चा, महिला आघाडी आदी उन्मेष पाटील यांच्या पाठिंब्यासाठी दौऱ्यात सामील झाले होते. 

Web Title: marathi news jal gaon bjp shena yuti sabha modi unmesh patil