जिल्हाधिकाऱ्यांच्या पुरवठा विभागावर एसीबीचा छापा... महिला कर्मचाऱ्यांसह चौघांना अटक !

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 मार्च 2020

जळगाव  : पुरवठा विभागाच्या रेकॉर्डवर आजोबाच्या नावे असलेले रेशन दुकान नातुच्या नावे हस्तांतरीत करण्यासाठी 40 हजारांच्या लाचेची मागणी करण्यात आली होती. लाच देण्याची ईच्छा नसतांना त्याला संबधीत अधिकाऱ्यांकडून सतत लाचेची मागणी सुरु होती. नाईलाजास्तव जिल्हाधिकारी कार्यालय आवारातच लाचलूचपत विभागाच्या कार्यालयात जावुन लेखी तक्रारीसह संशयीतांचे रेकॉर्डींग ऐकवल्यावर दखल घेत डीवायएसपी गोपाल ठाकुर यांच्यासह पथकाने सापळा रचला भर दुपारी चार संशयीतांना लाच स्वीकारतांना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे.

जळगाव  : पुरवठा विभागाच्या रेकॉर्डवर आजोबाच्या नावे असलेले रेशन दुकान नातुच्या नावे हस्तांतरीत करण्यासाठी 40 हजारांच्या लाचेची मागणी करण्यात आली होती. लाच देण्याची ईच्छा नसतांना त्याला संबधीत अधिकाऱ्यांकडून सतत लाचेची मागणी सुरु होती. नाईलाजास्तव जिल्हाधिकारी कार्यालय आवारातच लाचलूचपत विभागाच्या कार्यालयात जावुन लेखी तक्रारीसह संशयीतांचे रेकॉर्डींग ऐकवल्यावर दखल घेत डीवायएसपी गोपाल ठाकुर यांच्यासह पथकाने सापळा रचला भर दुपारी चार संशयीतांना लाच स्वीकारतांना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. महाराष्ट्रात आजवर झालेल्या सापळ्यात एकाच वेळी संपुर्ण खातेच अटक होण्याची हि दुर्मिळ घटना असल्याचे बोलेले जात आहे. 

भुसावळ येथील मुळ रहिवासी तक्रारदार(वय-25) यांचे आजोबांच्या नावे रेशनदुकान आहे, पुरवठा विभागाने दिलेल्या लायसन्स मान्यतेसह रेशन दुकान नातवाच्या नावे हस्तांतरीत करण्यात यावे यासाठी 11 मार्च रोजी अर्ज करण्यात आला होता. अर्जावर जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयातील महिला अव्वल कारकुन प्रमिला भानुदास नारखेडे (वय-57 रा.भुसावळ) यांनी तक्रारदार तरुणाला लाचेची मागणी केली. त्यानंतर महिला अव्वल कारकुन पुनम अशोक खैरनार(वय-37,रा.) यांच्यासह प्रकाश त्र्यंबक पाटिल(वय-55 हमाल कंत्राटदार, रा.जाकीर हुसैन कॉलनी जळगाव) अशांनी तक्रादाराकडे लाचेच्या रकमेसाठी तगादा लावला होता. आज तक्रारदारा कडून लाचखोरांचा खासगी पंटर योगेश नंदलाल जाधव(वय-33,रा.गुजराल पेट्रोल पंप)याने रक्कम हातात घेताच पाळतीवर असलेल्या पथकाने संशयीतांना ताब्यात घेतले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon ACB raids on Collector's Supply Department.