लग्नापुर्वीच वधू- वरांची याला पसंती...

pre wedding photoshoot
pre wedding photoshoot

जळगाव : महिनाभराच्या विश्रांतीनंतर पुन्हा लग्नसराईस सुरवात झाली आहे. यामुळे महानगरांनंतर आता छोट्या शहरांमध्येही "प्री-वेडिंग फोटोशूट'ची "क्रेझ' वाढत आहे. यापूर्वी लग्नाआधीच्या "प्री-वेडिंग शूट्‌स' केवळ उच्चभ्रू लोकांकडूनच पसंती दिली जात होती, परंतु आजच्या डिजिटल जमान्यान फोटो शूट कमी खर्चिक असल्याने मध्यमवर्गीय कुटुंबातही हा ट्रेंड वाढत आहे. 


दोन कुटुंबातील संबंध आणि तरुण जोडप्यांच्या व्यस्ततेनंतर वधू-वरांना लग्नाच्या पूर्व शूट्‌सद्वारे एकमेकांना अधिक जवळून जाणून घेण्याची संधी दिली जात आहे. हल्ली छायाचित्रकारांशी संपर्क साधून फोटोशूटविषयी माहिती मिळवत आहेत. बदलत्या ट्रेंडच्या पार्श्वभूमीवर आता लग्नाचे फोटोशूट्‌स करणाऱ्यांनीही नवीन ट्रेंड स्वीकारला आहे. साधारणत: पूर्वीचे मोठे फोटो स्टुडिओ प्री-वेडिंग शूट करायचे, पण आता हा एक सामान्य ट्रेंड बनला आहे. डिजिटल डिव्हाइस आणि तंत्रज्ञानाने हे अधिक सुलभ केले आहे. 

काय आहे "प्री-वेडिंग' 
लग्न निश्‍चित झाल्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन छायाचित्रण केले जाते. ज्यामध्ये काही लग्नाआधीचे क्षण कैद केले जातात. तरुणांच्या पसंतीवर आधारित, यात बॉलिवूड चित्रपटातील गाण्यांची लय घेत संपूर्ण शूट ड्रोन कॅमेरा, गिंबल कॅमेऱ्याच्या मदतीने करण्यात येतो. "प्री-वेडिंग शूट' यापुढे सर्वसामान्यांना परवडणारे होणार असल्याने जवळपास पन्नास टक्के तरुण आता लग्नाआधी "प्री-वेडिंगचे शूट' करत आहेत. 

पर्यटनस्थळांवर चित्रण 
लग्नापूर्वीच्या शूटसाठी नैनिताल, भीमताल, मुक्तेश्वर यांचे सुंदर पूर्वावलोकन तरुणांना आवडत आहेत. यामागील सर्वात मोठे कारण म्हणजे या भागातील नैसर्गिक सौंदर्य तसेच रेस्टॉरंट्‌स व्हिडिओ शूटसाठी सहज उपलब्ध आहेत. याशिवाय लोकांच्या पसंतीनुसार या भागात पुरेशी जागा आहेत. बहुतेक लोक डोंगर, तलाव येथे फोटोशूट करणे पसंत करतात. कमी बजेट फोटो शूट प्री-वेडिंग फोटो शूटसाठी आता जास्त फ्रिल आणि बजेटची आवश्‍यकता नाही. तुमच्या बजेटनुसार कमी किमतीच्या इनडोअर आणि मैदानी क्षेत्रे निवडून तुम्ही केवळ 30 ते 50 हजार रुपयांमध्ये प्री-वेडिंग शूट घेऊ शकता. जर बजेट अधिक असेल तर शहराबाहेरील इतर शहरांच्या सुंदर ठिकाणी जाऊन आपण पन्नास हजार ते एक लाख रुपये खर्च करू शकता. 

जिल्ह्यातील पर्यटनस्थळांना पसंती 
प्री वेडींग शुटींगसाठी आता आर्यन पार्क, परेश फार्म, कोल्हे हिल्स, मेहरूण (जळगाव), चांगदेव (मुक्ताईनगर), पाटणादेवी (चाळीसगाव), तसेच सातपुडा पर्वतातील उनपदेव, मनुदेवी, पद्मालय अशा प्रकारे जिल्ह्यातील ठिकठिकाणी ड्रोनचा वापर करून शुटींग केले जात आहे. काही खासगी रिसोर्टवर प्री-वेडींग शूटसाठी ठराविक रक्कमही शुल्क म्हणून आकारली जाते. 

आजकाल प्रत्येक वधूवरांना प्री-वेडिंग शूट करावे असे वाटते. प्री-वेडिंग शूटचे ठिकाण ग्राहकांच्या पसंतीवर अवलंबून असते. काही डोंगरांसारखे, काही समुद्र किनारा यासारखे, काही किल्ले किंवा वाड्यांसारखे त्याच्या निवडीनुसार प्री-वेडिंग शूटिंगची किंमत तुमच्या बजेटनुसार केली जाते. तुमच्या बजेटनुसार प्री-वेडिंग शूटिंगची करता येणे शक्‍य असल्याने आता मध्यमवर्गीयांनाही याचे वेड लागले आहे. 
- प्रकाश मुळे, फोटोग्राफर जळगाव 

गेल्या 13 वर्षांपासून जळगाव जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रा बाहेर आत्ता पर्यंत 500 पेक्षा जास्त प्री वेडिंग सॉंग आणि प्री वेडिंग फोटोग्राफी केली आहे. लोकांच्या आवडीनिवडी नुसार शुटींगचे ठिकाण ठरवता येते. आजच्या काळात लग्नसमारंभात लग्नमंडपात प्रीवेडिंग शुट केलेले व्हिडीओ प्रोजेक्‍टरच्या माध्यमातून दाखवण्याची ही क्रेझ निर्माण झाली आहे. 
- अमोल पाटील, प्री- वेडिंग फोटोग्राफर, जळगाव 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com