म्हणाला...आपण लग्न करु... अन्‌ केला अत्याचार !

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 मे 2020

मी तुझ्याशी लग्न करेल असे सांगून संशयित आरोपी सपकाळे याने जानेवारी 2020 ते मार्च-2020 दरम्यान वेगवेगळ्या ठिकाणी अत्याचार केला.

जळगाव,:-लग्नाचे आमिष दाखवत वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन 24 वर्षीय तरुणीवर अत्याचार केल्याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात एका तरुणा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज सकाळी संशयित आरोपीस अटक करण्यात आले आहे. 

तालुका पोलिसांत दाखल तक्रारीत नमूद केल्या प्रमाणे, मी तुझ्याशी लग्न करेल असे सांगून 24 वर्षीय तरुणीला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन अत्याचार करणारा संशयित आरोपी ज्ञानेश्वर अशोक सपकाळे (रा. सावखेडा बु. ता.जि.जळगाव) याच्या विरोधात पीडित तरुणीच्या फिर्यादीवरून जळगाव तालुका पोलिस ठाण्यात सोमवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. आज सकाळी 6 वाजेच्या सुमारास राहत्या घरातून तालुका पोलिसांनी अटक केली आहे. पीडित तरुणीने फिर्यादीत म्हटले आहे की, संशयित आरोपी सपकाळे याने मला लग्नाचे आमिष दाखवत जानेवारी 2020 ते मार्च-2020 दरम्यान वेगवेगळ्या ठिकाणी अत्याचार केला. दरम्यान काल सोमवारी 18 मे रोजी दुपारी 12 वाजता मला पुन्हा फूस लावून नेत तापी नदी पात्रात अत्याचार केला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयित आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील तपास सहाय्यक निरीक्षक चव्हाण करीत आहेत. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Atrocities on a young woman showing the lure of marriage