जळगाव जिल्हा द्विशतकाच्या उंबरठ्यावर...आणखी सात कोरोना रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह ! 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 मे 2020

जिल्ह्यात आजपर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून पंचवीस रूग्णांचा मृत्यू 
झाला आहे.

जळगाव ः जिल्ह्यातील जळगाव, अमळनेर, पाचोरा, भुसावळ येथील स्वॅब घेतलेल्या 39 कोरोना संशयित व्यक्तींचे नमुना तपासणी अहवाल आता नुकताच प्राप्त झाले आहे. यापैकी 32 व्यक्तीचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर सात व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. 

पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तीमध्ये पाचोरा एक, जळगाव दोन तर भुसावळच्या चार रूग्णांचा समावेश आहे. यामध्ये पाचोरा येथील 21 वर्षीय तरूणाचा, जळगाव शहरातील शांतीनगर येथील 51 वर्षीय व श्रीराम नगरातील 63 वर्षीय पुरूषाचा तर भुसावळ येथील 58, 60, 70 वर्षीय पुरूषांचा तर 50 वर्षीय महिलेचा समावेश आहे. 

अमळनेर पून्हा एक कोरोना रुग्ण 
तसेच अमळनेर येथील यापूर्वीच कोरोना बाधित आढळून आलेल्या एका 58 वर्षीय पुरूषाचा 14 दिवसानंतरचा तपासणी अहवालही पॉझिटिव्ह आला आहेत. 

जिल्हा द्विशतकाच्या उंबरठ्यावर 
जिल्ह्यात आजपर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून पंचवीस रूग्णांचा मृत्यू 
झाला आहे. तर एकोणतीस रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहे. तर आता कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या 190 इतकी झाली असून त्यापैकी अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon aunother sevan corona patient positive, dubbal senchuri Walk