coronavirus : "कोरोना'बाबत गर्दीच्या ठिकाणी उद्‌घोषणाद्वारे सजगता 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 14 March 2020

जळगाव ः "कोरोना' विषाणूबाबत सर्वच यंत्रणा जागरूक झालेल्या आहे. रेल्वेस्थानक, बसस्थानक, बाजारपेठेत नागरिक स्वतःहून तोंडाला रुमाल किंवा मास्क वापरून येताना दिसत आहे. बसस्थानक, रेल्वेस्थानकांवर स्वच्छतेचे आदेश दिले असून एका ठिकाणी अधिक वेळ न थांबण्याचे आवाहन केले जात आहे. 

जळगाव ः "कोरोना' विषाणूबाबत सर्वच यंत्रणा जागरूक झालेल्या आहे. रेल्वेस्थानक, बसस्थानक, बाजारपेठेत नागरिक स्वतःहून तोंडाला रुमाल किंवा मास्क वापरून येताना दिसत आहे. बसस्थानक, रेल्वेस्थानकांवर स्वच्छतेचे आदेश दिले असून एका ठिकाणी अधिक वेळ न थांबण्याचे आवाहन केले जात आहे. 

रुमाल बांधूनच प्रवास करा 
बसस्थानकावर स्वच्छतेचे आदेश दिले आहेत. सर्व बस फिनाईल ने स्वच्छ ठेवण्याचे स्वच्छता करणाऱ्यांना आदेश आहेत. प्रवाशांनी कोरोनाबाबत दक्षता कशी घ्यावी? याबाबत बस स्थानकांवर उद्‌घोषणा केली जात आहे. बसमध्ये चढताना एकावेळी गर्दी न करता रांगेत जा किंवा उतरा, तोंडाला रुमाल बांधून प्रवास करा, स्वच्छता राखा असे संदेश दिले जात असल्याची माहिती एस. टी. महामंडळाचे विभाग नियंत्रक राजेंद्र देवरे यांनी दिली. 

हस्तांदोलन न करण्याचे आवाहन 
बाजारपेठेत अनेक प्रकारचे ग्राहक येतात. आता कोरोना'मुळे सर्वांशीच हस्तांदोलन, गळाभेट टाळा. अनेकांना हातजोडूनच नमस्कार करा, ग्राहकांनाही एकमेकांशी हातमिळवू नका, गर्दीत जाऊ नका, खोकला आला असेल तर तोंडाला रुमाल लावा, असे आम्ही ग्राहकांना आवाहन करीत असल्याचे जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळाचे उपाध्यक्ष युसूफ मकरा यांनी सांगितले 

रेल्वेतर्फे व्यापक उपाय 
रेल्वेद्वारे सर्वाधिक नागरिक प्रवास करतात. यामुळे सर्वच रेल्वे स्थानकांवर "कोरोना' नियंत्रण कक्षांची स्थापना केली आहे. कर्मचाऱ्यांना याबाबत प्रशिक्षित केले आहे. रेल्वे स्थानकांवर, गाड्यांमध्ये मराठी, इंग्रजी, हिंदी भाषांमध्ये "कोरोना'बाबत माहिती दिली जात आहे. त्या संबंधित साहित्य (पोस्टर्स, पत्रके) सामान्य जनजागृतीसाठी स्पष्टपणे दर्शविली आहेत. जनजागृती करण्यासाठी रेल्वे स्थानकांवर ऑडिओ व व्हिडिओ क्‍लिप्स दाखविल्या जात आहेत. स्थानकांवर, गाड्यांमध्ये उद्‌घोषणा केल्या जात आहेत. भुसावळ रेल्वे रुग्णालयांना कोरोना विषाणूंच्या संशयास्पद घटनांचा उपचार करण्यासाठी वेगळे वॉर्ड उपलब्ध करून दिला आहे. कोरोना विषाणूंच्या आजाराचा कोणताही संशयित रुग्ण आढळल्यास अथवा नोंदवले गेल्यास तातडीने रेल्वे रुग्णालय, आरोग्य युनिटमध्ये रेल्वे बोर्ड व स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांना कळविण्यास सांगितले आहे. ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जनजागृती केली जात आहे. स्टेशन कर्मचाऱ्यांना तातडीने आवश्‍यक कारवाईसाठी कोरोना जागरूक केले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Awareness about the "Corona" announced in a crowded venue