वर्षानुवर्षे पडलेल्या कचऱ्यावर "बायोमायनिंग'द्वारे प्रक्रिया 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 मे 2019

जळगाव ः शहरातील विविध भागातून रोज शेकडो टन कचरा जमा होत असतो. जमा केलेला हा कचरा आव्हाणे शिवारात असलेल्या महापालिकेच्या घनकचरा प्रकल्पाठिकाणी टाकण्यात येत आहे. वर्षानुवर्षे साचून असलेला सुमारे 1 लाख मेट्रिक टन कचऱ्यावर "बायोमायनिंग'द्वारे प्रक्रिया करून यातून निघणाऱ्या साहित्याचा लिलाव करणे आणि ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून कंपोस्ट खत तयार करण्यात येणार आहे. 

स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत घनकचरा व्यवस्थापन सविस्तर प्रकल्पाची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यात महापालिका प्रशासनाकडून शहरातून गोळा होणारा कचरा हा आव्हाणे शिवारातील घनकचरा प्रकल्पाच्या ठिकाणी टाकण्यात येत असतो. बऱ्याचदा हा कचरा जाळण्यात येत असतो. कचरा जाळल्यानंतर त्यातून निघणाऱ्या धुराचा त्रास परिसरातील नागरिकांना सहन करावा लागत असतो. याबाबत अनेक तक्रारी देखील आहेत. कचऱ्याची ही समस्या सोडविण्यासाठी वर्षानुवर्षे पडून असलेल्या कचऱ्यावर "बायोमायनिंग'द्वारे प्रक्रिया करण्याचे पाऊल महापालिकेने उचलले आहे. 

आठवडाभरात टेंडर 
आव्हाणे शिवारातील घनकचरा प्रकल्पात शहरातून जमा होणाऱ्या कचरा साचून आतापर्यंत 1 लाख मेट्रिक टन कचरा साचला आहे. या कचऱ्याचे बायोमायनिंग करण्यात येणार असून, याकरिता साधारण 4 कोटी 26 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. परंतु, प्रकल्प राबविण्यासाठी या कामाचे टेंडर मनपाच्या घनकचरा विभागाकडून तयार करण्यात आले असून, आचारसंहिता संपल्यावर म्हणजे पुढील आठवड्यात टेंडर प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. संपूर्ण कचऱ्यावर प्रक्रिया करण्यास साधारण सहा महिन्याचा कालावधी लागणार आहे. 

काय आहे "बायोमायनिंग' 
वर्षानुवर्षे पडून असलेल्या कचऱ्यावर बायोमायनिंगद्वारे प्रक्रिया करणे म्हणजे ओला आणि सुका कचरा वेगळा करण्यात येतो. यात ओला कचऱ्याचे कंपोस्टींग करण्यात येणार आहे. तर न कुजणाऱ्या वस्तूंचे रिसायकलिंग केले जाणार आहे. शिवाय यातून निघणाऱ्या साहित्याचा लिलाव केला जाईल. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कचरा टाकण्यात आलेल्या जागेचे सपाटीकरण केले जाईल. ही सर्व प्रक्रिया "बायोमायनिंग' प्रक्रियेत होणार आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon baimayning praklp kachra