"बेटी बचाओ'मधील कामगिरीमुळे जिल्ह्याचा देशपातळीवर गौरव 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 6 जुलै 2019

जळगावः "बेटी बचाओ बेटी पढाओ' या अभियानांतर्गत जळगाव जिल्ह्याने गेल्या पाच वर्षांत चांगली कामगिरी केली. यामुळे जिल्ह्यात मुलींची संख्या वाढली आहे. याची दखल केंद्रीय महिला बालविकास मंत्रालयाने घेतली आहे. नवी दिल्ली येथे जिल्हाधिकाऱ्यांचा 7 ऑगस्टला गौरव करण्यात येणार आहे. 
याबाबत केंद्रीय महिला बालविकास मंत्रालय, दिल्ली कार्यालयाचे अप्पर सचिव आर. मोसेस चलाई यांनी जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांना पत्र दिले आहे. 

जिल्ह्याने "बेटी बचाओ बेटी पढाओ' या अभियांनतर्गत लिंग गुणोत्तर (एसआरबी)सह सुधारणेवर सातत्याने भर दिला आहे. जिल्ह्याने 2014-15 ते 2018-19- या काळात एमओएच व एफडब्लूच्या (एचएमआयए) नुसार सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. यामुळे हा सन्मान होणार आहे. 
महिला बालविकास मंत्रालयाने 5 राज्ये आणि 10 जिल्ह्यांची निवड केली आहे. या जिल्ह्यांनी मागील वर्षात जन्म प्रमाण (एसआरबी) मध्ये सातत्याने चांगले प्रदर्शन केले आहे. या कार्याचा गौरव करण्यासाठी निवड झालेल्या जिल्ह्यांचा सन्मान केला जाणार आहे. हा सन्मान स्वीकारण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी उपस्थित राहण्याचे पत्र आज जिल्हाधिकारी कार्यालयाला मिळाले. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon beti bachao abhiyan