esakal | भुसावळ रेल्वे विभागासाठी ६५० कोटी रुपयांची तरतूद 
sakal

बोलून बातमी शोधा

भुसावळ रेल्वे विभागासाठी ६५० कोटी रुपयांची तरतूद 

भुसावळ रेल्वे विभागासाठी ६५० कोटी रुपयांची तरतूद 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

भुसावळ ः रेल्वेचा पूर्वी स्वतंत्र रेल्वे बजेट यायचा. आता एकत्रित आला आहे. यावर्षीच्या अर्थ संकल्पामध्ये भुसावळ विभागासाठी सुमारे ६५० कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला आहे. येत्या चार महिन्‍यांमध्ये भुसावळ विभागातील सर्व पॅसेंजर गाड्या बदलून त्याजागी आधुनिक सुविधा असलेल्या मेमू गाड्या धावणार आहेत. तसेच पाचोरा- जामनेर पीजे रेल्वेचे ब्रॅडगेजमध्ये रुपांतर करुन हीच गाडी पुढे मलकापुर पर्यंत धावणार असल्याची माहीती विभागीय व्यवस्थापक विनयकुमार गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

श्री. गुप्ता म्हणाले, की पाचोरा- जामनेर रेल्वे मलकापुरपर्यंत नेण्याचा डीपीआर बनविण्यात येत आहे. भुसावळ विभागात शंभर टक्के विद्युतीकरण झालेले आहे. चाळीसगाव, धुळे मार्गाचे काम पुढच्यावर्षी पूर्ण होईल. विभागातील सर्व १६ पॅसेंजर गाड्या बंद करुन त्याऐवजी १६ डब्यांची मेमू गाड्या धावणार आहेत. तशी एक गाडी भुसावळला दाखलही झालेली आहे. रेल्वेचे ३० टक्के अपघात रेल्वे क्रॉसिंगमुळे होतात. विभागातील सर्व १०७ क्रॉसिंग २०२४ पर्यंत सर्व बंद करण्यात येणार आहेत. यासाठी राज्य सरकारच्या मदतीने टप्प्या टप्प्याने स्वतंत्र निधी रेल्वेने उपलब्‍ध करुन दिला आहे. यामुळे अपघात व वेळेची बचत होईल व गाड्या वेग धरतील. विभागात चोविस लिफ्ट व आठ एक्सलेटर तसेच सर्व ७० स्थानकांना वायफाय सुविधा पुरविली जाणार आहे. २० स्थानकांवर सी. सी. कॅमेरे, हायमस्ट दिवे एईडी नवीन शौचालय तसेच अकोला, भुसावळ व नाशिक येथे वातानुकुलीत विश्रामगृहे उभारली जाणार आहेत. याशिवाय डीस्प्ले, अनाऊंसिंग व ईंडीकेटर आधुनिक करण्यात येत आहे.नो बिल नो पेमेंन्टवर भर देणार आहे. भुसावळ येथील २९ व विभागातील २२० वेंन्डरांना गणवेशातच मालाची विक्री करावी लागणार. जास्तीत जास्त मोबाईल अॅपचा वापर तिकिटासाठी व्हावा. स्वच्छतेला प्राधान्‍य, अकोला स्थानकावर मसाजर, वृद्धांसाठी बॅटरीकार या सुविधा पुरविल्या जाणार आहेत अशी माहीती श्री.गुप्ता यांनी दिली. यावेळी सहाय्यक रेल्वे व्यवस्थापक मनोजकुमार सिन्हा, वरिष्ठ कार्मिक अधिकारी आर. के. शर्मा यांच्यासह जीवन चौधरी, प्रीतम राणे व प्रमोद साळुंखे आदी उपस्थित होते
 

loading image