esakal | भाजपचा फौजफाटा खडसेंना घेरण्याच्या तयारीत ! 
sakal

बोलून बातमी शोधा

भाजपचा फौजफाटा खडसेंना घेरण्याच्या तयारीत ! 

माध्यमांसमोर नाराजी व्यक्त करणे चुकीचे असल्याचे सांगितले. खडसेंकडे यापूर्वी घरातच अनेक असलेले पद, दुसऱ्यांना का संधी दिली नाही

भाजपचा फौजफाटा खडसेंना घेरण्याच्या तयारीत ! 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

जळगाव :भारतीय जनता पार्टीने एकनाथराव खडसेंना विधान परिषदेचे तिकीट नाकारून त्यांना डावले. यावर संतप्त झालेले खडसेंनी भाजपच्या कार्यपद्धतीवर आता थेट आरोप करत विविध वाहिन्यांवर मी कुठे चुकलो ? असे ते अशा प्रश्‍नांची विचारणा करत आहे. कॉंग्रेस कडून मला सहाव्या जागेसाठी ऑफर आली परंतू कोरोनाची परिस्थितीमुळे हा निर्णय घेतला नसल्याचे खडसे सांगत जरी असले तरी भाजप आता खडसेंच्या आरोपावर प्रत्युत्तर देण्यासाठी आता भाजपच्या नेत्यांचा फौजफाटा तयारीत आहे. 

एकनाथराव खडसेंना 2019 च्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपाने तिकीट नाकारून त्यांच्या कन्या रोहिणी खडसे-खेवलकर यांना एैनवेळी तिकीट दिले. परंतू त्यांचा पराभव झाला त्यानंतर खडसेंचा पक्षांतराच्या अनेक बातम्या आल्या तसेच गोपीनाथ गडावरून त्यांची नाराजी अशा अनेक घडामोडी राजकीय घडल्या होत्या. त्यात विधान परिषदेवर खडसेंना घेवून त्यांचे पुनर्वसन भाजप करणार असे बोलले जात होते. परंतू आता पुन्हा त्यांना भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी त्यांचे तिकीट नाकारले आहे. त्यामुळे खडसे भाजपच्या कार्यपद्धतीवर थेट आरोप करून पक्षातील एकनिष्ठ कार्यकर्त्यांना डावलून मोदींना परत जा अशा घोषणा देणाऱ्यांनाच भाजप आता उमेदवारी देत असल्याचे आरोप त्यांनी केले होते. 

खडसेंवर आता प्रश्‍नांचा होणार भडीमार 
खडसेंकडून केले जात असलेले आरोपांवर भाजपचे प्रमुख नेत्यांनी त्यांच्यावर प्रतिहल्ला करण्याचा ठरविले आहे. याची सुरवात आज चंद्रकांत पाटील यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केली असून त्यांनी तिकीट मिळाले नाही म्हणून नाराज होणे स्वाभाविक आहे. पण माध्यमांसमोर नाराजी व्यक्त करणे चुकीचे असल्याचे सांगितले. खडसेंकडे यापूर्वी घरातच अनेक असलेले पद, दुसऱ्यांना का संधी दिली नाही अशा अनेक प्रश्‍न भाजपकडून आता थेट खडसेंना विचारले जाणार आहे. 

स्टॅंम्प शिवाय कागदाला किंमत नाही 
भाजपने गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी दिल्यावर सांगलीतील एका नेत्या चंद्रकांत पाटील यांना चंद्रकांत पाटील यांचे स्टॅंम्प असल्याचा आरोप केला होता. त्यावर वृत्तवाहिनीशी बोलताना पाटील म्हणाले, की स्टॅंम्प शिवाय कागदाला किंमत नसते. 
 

loading image
go to top