esakal | जळगाव शहरात दोन कोरोना बाधित रूग्ण 
sakal

बोलून बातमी शोधा

corona

जळगाव जिल्हा कोरोना व्हायरसचा रेडझोन झाला आहे. जळगावात पहिला रूग्ण आढळल्यानंतर खळबड उडाली होती. त्यानंतर पंधरा दिवस कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून न आल्याने जिल्हा सेफ मानला जात होता.

जळगाव शहरात दोन कोरोना बाधित रूग्ण 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जळगाव ः येथील कोविड रूग्णालयात स्वॅब घेतलेल्या 34 कोरोना संशयित व्यक्तीचे तपासणी अहवाल आज दुपारी नुकतेच प्राप्त झाले. यापैकी 32 व्यक्तीचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असून दोन व्यक्तीचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. हे दोन्हीही रूग्ण जळगाव शहरातील आहेत. 

जळगाव जिल्हा कोरोना व्हायरसचा रेडझोन झाला आहे. जळगावात पहिला रूग्ण आढळल्यानंतर खळबड उडाली होती. त्यानंतर पंधरा दिवस कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून न आल्याने जिल्हा सेफ मानला जात होता. मात्र या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. यात अमळनेर हॉटस्पॉट ठरला असून, त्या पाठोपाठ आता भुसावळ देखील हॉटस्पॉट होण्याच्या मार्गावर आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 45 इतकी झाली आहे. अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने दिली आहे 

शहरात आठ पॉझिटीव्ह 
जळगाव शहर आतापर्यंत सेफ झोनमध्ये मानले जात होते. परंतु मागील तीन दिवसात शहरातील कोरोना पॉझिटीव्हचा आकडा देखील झपाट्याने वाढत आठपर्यंत पोहचला आहे. आज प्राप्त अहवालातील दोन व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे. यात एक 24 वर्षीय तरूण हा मारूतीपेठ येथील असून दुसरी व्यक्ती 21 वर्षीय महिला आहे. सदर महिला चिचोंल (ता. बाळापूर, जि अकोला) येथील असून ती शहरातील समतानगर परिसरात वास्तव्यास आहे.

loading image