गैरहजर डॉक्‍टर, कर्मचाऱ्यांना 48 तासांचा "अल्टिमेटम' 

अमोल कासार
शनिवार, 16 मे 2020

जळगावातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोविड रुग्णालयात म्हणून घोषित करण्यात आले आहे. जिल्ह्यात "कोरोना'चे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत कोविड रुग्णालयातील डॉक्‍टरांसह वैद्यकीय अधिकारी, सीएचओ, परिचारिका व व्यवस्थापकीय अधिकारी गेल्या दोन महिन्यांपासून गैरहजर असल्याचा प्रकार उघडकीस आला होता. 

जळगाव : "कोरोना व्हायरस'ला रोखण्यासाठी वैद्यकीय यंत्रणा दिवसरात्र काम करीत आहे. मात्र, कोविड सेंटरसह कोविड रुग्णालयातील डॉक्‍टरांसह कर्मचारी मोठ्या संख्येने गैरहजर असल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या सर्व गैरहजर डॉक्‍टर, कर्मचाऱ्यांना 48 तासांत हजर होण्याचे आदेश जिल्हा शल्यचिकित्सक तथा नोडल ऑफिसर डॉ. नागोराव चव्हाण यांनी काढले आहे. मुदतीत हजर न झाल्यास संबंधितांवर सेवा समाप्तीची कारवाई करण्यात येणार आहे. 
जळगावातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोविड रुग्णालयात म्हणून घोषित करण्यात आले आहे. जिल्ह्यात "कोरोना'चे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत कोविड रुग्णालयातील डॉक्‍टरांसह वैद्यकीय अधिकारी, सीएचओ, परिचारिका व व्यवस्थापकीय अधिकारी गेल्या दोन महिन्यांपासून गैरहजर असल्याचा प्रकार उघडकीस आला होता. 

तोकडे मनुष्यबळावर डोलारा 
कोविड रुग्णालयातील बहुतांश डॉक्‍टर, कर्मचाऱ्यांनी कोविड रुग्णालयात त्यांना दिलेल्या जबाबदारी पार पाडण्यास नकार दिला आहे. ते गेल्या दोन महिन्यांपासून गैरहजर असल्याने तोकड्या मनुष्यबळावर रुग्णांवर उपचार सुरू असल्याची परिस्थिती निर्माण आहे. 

हजर व्हा; अन्यथा सेवा समाप्ती 
कोविड रुग्णालयासह जिल्हाभरातील उपजिल्हा रुग्णालयातील बहुतांश डॉक्‍टरांसह कर्मचारी गैरहजर आहेत. या गैरहजर डॉक्‍टर, कर्मचाऱ्यांना आदेशान्वये शल्यचिकित्सक तथा नोडल ऑफिसर डॉ. चव्हाण निर्वाणीचा इशारा दिला असून, हजर न होणाऱ्यांवर सेवा समाप्तीची कारवाई केली जाणार आहे. 

ज्युनिअर, शिकाऊ डॉक्‍टरांवर मदार 
शहरातील कोविड रुग्णालयात सिनिअर व ज्युनिअर असे मिळून 235 डॉक्‍टरांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, प्रत्यक्षात कोविड रुग्णालयात केवळ दहा डॉक्‍टरांसह इतर ज्युनिअर व शिकाऊ डॉक्‍टरांच्या मदतीने कोविडच्या रुग्णांवर उपचार केले जात असल्याने त्यांच्यावर कोविड रुग्णालयाची मदार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon civil corona service absent doctor altimetum

टॅग्स
टॉपिकस