coronavirus पोलिसांना इन्क्वेस्ट पंचनामा करण्यापासुन सुटका

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 एप्रिल 2020

कोरोना तपासणी अहवालात पॉझेटीव्ह आलेला रुग्ण असो, पोलिस ठाण्यात अकस्मीक मृत्युची नोंद झाल्यावर संबधीत तपासाधिकाऱ्याला मृतदेहाचा इन्क्वेस्ट पंचनामा अर्थात मृत्यु पश्‍चात शारीरीक जखमा, व्रण, गोंदल्याच्या खुणा, मृतदेहाची अवस्था, अंगावरील कपडे अशांची तपासणी करावी लागत होती.

जळगाव : कोरोना विषाणुच्या पादुर्भावामुळे जगभरात भितीचे वातावरण पसरले आहे. कोरोना संशयीताचा किंवा तपासणीत पॉझेटीव्ह आलेल्या रुग्णाचा शवविच्छेदनापुर्वीच पोलिसांना इक्वेस्ट पंचनामा करावा लागत होता. आता त्यातून पोलिसांची मुक्ताता होवुन इक्वेस्ट पंचनामा करावा लागणार नाही. 

देशभरात कोरोना विषाणुने दहशत माजवली आहे. संपर्कात येणाऱ्या कोणालाही संसर्ग होवुन त्यातून आजाराचा फैलाव होत असल्याने शासनाने संचारबंदी, लॉकडाऊन आणि सोशल डिस्टन्सींगचा अंमल करण्याची ताकिद जनतेला दिली आहे. असे असतांना कोरोना आजारांचे लक्षणे आढळून आलेल्या, किंवा कोरोना संशयीत म्हणुन मृत्युमूखी पडलेला रुग्ण असो की, कोरोना तपासणी अहवालात पॉझेटीव्ह आलेला रुग्ण असो, पोलिस ठाण्यात अकस्मीक मृत्युची नोंद झाल्यावर संबधीत तपासाधिकाऱ्याला मृतदेहाचा इन्क्वेस्ट पंचनामा अर्थात मृत्यु पश्‍चात शारीरीक जखमा, व्रण, गोंदल्याच्या खुणा, मृतदेहाची अवस्था, अंगावरील कपडे अशांची तपासणी करावी लागत होती. आता मात्र, राज्यशासनाच्या गृहमंत्रालयाने पोलिसांना कोरोना संशयीताच्या मृतदेहाचा इन्क्वेस्ट पंचनामा न करण्याची मुभा दिली आहे. 

अध्यादेश पारीत 
गृहविभातर्फे उपसचिव शिरीष मोहोड यांनी आजच पारीत केलेल्या अध्यादेशात नमुद केल्या प्रमाणे, साथरोग नियंत्रण कायदा-1897 मधील भाग-2, सह आपत्ती व्यवस्थापन कायदा,2005 मधील तरतुदीन्वये कोरोना बांधीत किंवा संशयीत मृतदेहातून रोगाचा प्रसार होवुनये या करीता पोलिसांना इन्क्वेस्ट पंचनामा न करण्याची मुभा दिली आहे. आदेश तत्काल प्रभावाने लागू करण्यात आले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon corona deathbody no panchmana police