esakal | घराघरांत पोहोचणार "कोरोना' माहिती पुस्तिका 
sakal

बोलून बातमी शोधा

घराघरांत पोहोचणार "कोरोना' माहिती पुस्तिका 

पुस्तके पुढील काही दिवसांमध्ये वितरित करण्यात येणार असून, वितरण करताना प्रत्येक व्यक्तीने मास्कचा वापर, टोपी, हॅण्डग्लोव्हज, सॅनिटायझरचा उपयोग व पुस्तक वितरण करताना किमान एक मिटरचा अंतर राखून वितरण करण्यात येत आहे.

घराघरांत पोहोचणार "कोरोना' माहिती पुस्तिका 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

जळगाव : "कोरोना व्हायरस'वर मात करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन निर्देशित माहिती पुस्तिकेचे वितरण शहरात 30 मार्चपासून सुरू झाले. जैन इरिगेशनने शहरासाठी ही मार्गदर्शक माहिती पुस्तिका एक लाख छापून दिलेल्या असून, या पुस्तिका प्रत्येक घरोघरी व्यक्तिगत पातळीवर पोहोचविण्यात येत आहे.
 
कोविड-2019 (नवीन कोरोना विषाणू आजार - nCov) ही माहिती पुस्तिका छापताना व वितरण करताना सॅनिटायझरचा उपयोग करुन जंतूनाशकांची फवारणी करण्यात आली आहे. या पुस्तिकेमध्ये सर्वसाधारण माहिती, कोरोना आजाराची लक्षणे, आजार पसरतो कसा?, आजार होऊ नये, यासाठी घ्यावयाची काळजी, वैद्यकीय सल्ला ताबडतोब कोणी घेतला पाहिजे?, नवीन करोना विषाणू उपाययोजना, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन, राष्ट्रीय - राज्यस्तरीय व स्थानिक संपर्कासंदर्भातील संपूर्ण माहिती आदी पुस्तिकेत दिले असून ही सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासनाची पुस्तिका जैन इरिगेशन सिस्टिम्स्‌ लि. यांनी छापून दिली आहे. 

आजारासंदर्भात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (0257-2226642 (132) कोरोना कक्ष यावर संपर्क साधावा. माहिती पुस्तिकेचे व्यक्तिगत स्तरावर कालपासून (ता.30) शहरात वितरणाला सुरवात झाली असून आतापर्यंत 36 हजार पुस्तके वितरित करण्यात आले आहेत. उर्वरित पुस्तके पुढील काही दिवसांमध्ये वितरित करण्यात येणार असून, वितरण करताना प्रत्येक व्यक्तीने मास्कचा वापर, टोपी, हॅण्डग्लोव्हज, सॅनिटायझरचा उपयोग व पुस्तक वितरण करताना किमान एक मिटरचा अंतर राखून वितरण करण्यात येत आहे. या संदर्भात या सेवाभावी सर्व मुला-मुलींना प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, मनपा आयुक्त सतीश कुळकर्णी, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन व मुख्य लेखा परीक्षक संतोष वाहुळे यांचे सहकार्य लाभत आहे. माहिती पुस्तिकेच्या वितरण व्यवस्थेसाठी शहरातील विविध सेवाभावी संस्था व व्यक्तींचे योगदान लाभत आहे. 
 

loading image