मालेगावात बंदोबस्तावरील जळगावचे दोन पोलिस कोव्हिड पॉझेटिव्ह 

police corona
police corona

जळगाव : मालेगाव बंदोबस्ताला गेलेला जळगाव पोलिसदलातील दोन कर्मचारी कोरोना-पॉझेटीव्ह आढळल्याने संपुर्ण युनिट मध्ये खळबळ उडाली आहे. सततचा बंदोबस्त, नित्कृष्ट जेवण आणि सुविधा अभावी "कोरोना वॉरीयर्स' पोलिस कर्तव्यावर तैनात असून आजारपणाच्या तक्रारी करुनही या कर्मचाऱ्यांना उपचार मिळणे दुरापास्त झाल्याने कर्मचाऱ्यांनी वरीष्ठांना तक्रारी केल्या आहेत. गेल्या सहा दिवसांपासुन 4 कर्मचाऱ्यांना लक्षणे जाणवत असल्याने त्यांचे विलगीकरण न करताच आहे त्या ठिकाणीच "कॉरेन्टाईन' करण्यात आले होते, चौघांचा तपासणी अहवाल येवुन त्यात 2 कर्मचारी पॉझेटीव्ह आढळल्याने एकच भितीचे वातावरण परसले आहे. उपचारार्थ या कर्मचाऱ्यांना रुग्णालयात हलवण्यात आले आहे. 


कोव्हीड-19 अर्थात कोरोना आजाराने सर्वत्र थैमान घातल्याने राज्यात 21 मार्च पासून लॉकडाऊन करण्यात आले. पोलिस, आरोग्य यंत्रणा आणि वैद्यकीय सेवा सुविधेच्या जोरावर या महामारीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरु आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात(ता.29) बाधीत रुग्णांची संख्या 205 वर पोहचली असुन एकट्या मालेगाव मधील 182 रुग्ण आहेत. मालेगाव वासीयांच्या सुरक्षेकरीता तैनात पोलिसांनाच कोरोनाची बाधा झाल्याने आजवर 13 पोलिस कर्मचारी कोरोना बाधीत झाल्याचा सर्वाधीक आकडा मालेगाव शहरातील आहे. संपुर्ण गाव पुर्णत:बंद असून पोलिसांनी चारही बाजुने वेढा घातला आहे. राज्यातील विवीध जिल्ह्यातून अतिरीक्त पोलिस कुमक येथे दाखल झाली आहे, जळगाव जिल्हा पोलिस दलातील 110 पोलिस मालेगावसाठी बंदोबस्ताला पाठवले जाणार होते, पैकी 10 गैर हजर असल्याने 100 रवाना झाले होते. वायरलेस मेसेज प्राप्त होताच प्रत्येक पोलिस ठाण्यातून 2 किंवा 3 कर्मचारी अठरा दिवसांपासुन (ता.13) तैनात आहे. त्यापेैकी 4 जवान गेल्या 6 दिवसांपासुन आजारी होते. त्यांचे विलगीकरण अपेक्षीत असतांना, राहत्या जागेतच त्यांना कोरेन्टाईन करण्यात आले, कर्मचाऱ्यांनी त्रास होत असल्याने स्वत:जावुन तपासणी करवुन घेतल्यावर त्यापैकी यावल पीएस चा एक आणि भडगावचा दुसरा असे दोन कर्मचाऱ्याचा अहवाल कोरोना पॉझेटिव्ह आल्याने आज सकाळी त्याला रुग्णालयात हलवण्यात आले. परिणामी उर्वरीत 99 कर्मचाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले असून काही पळून जाण्याच्या विचारात आहेत. 

नित्कृष्ठ जेवणाचा उबग 
मालेगावातील मौसमपुलाच्या अलिकडे "ऐश्‍वर्या' मंगलकार्यालयात एकत्रच 100 कर्मचाऱ्यांना थांबवले असून दोन्ही वेळचे नित्कृष्ठ जेवणाने कर्मचाऱ्यांना उबग आल्याची परिस्थीती आहे. डिस्पोझेबल पॅकेट मध्ये कोरडीभाजी-भात अन्‌ दोन पोळ्या असे दोन्हीवेळचे जेवण आहे. 8 ते12 तासांचा खडा पहारा देवुन मुक्काच्या ठिकाणी परतल्यावर मिळालेले जेवण घेवुन निमुटपणे हे कर्मचारी अठरा दिवसा पासुन चोख कर्तव्य बजावत आहे. 

कुटूंब व खात्याला अभिमान पण.. 
जीवाची परवा न करताच, सर्वाधीक बाधीत परिसरात कर्तव्य बजावत असलेल्या पोलिसांना प्रसंगी दगड-गोट्यांचा मारही खावा लागत आहे, 50 लाखावर विमा शासनाने मंजुर केलेला असुन "कोरोना वॉरीयर' उपाधी प्राप्त या कर्मचाऱ्यांच्या कुटूंबीयांना सार्थ अभिमान असून जिल्हापोलीसदलाची मानही गर्वाने उंचावली आहे. कोरोना युद्धावर असलेल्या या सैन्याला सुविधा तर सोडाच मात्र, दोन घासही चांगले मिळत नाही. वारंवार आजारी असल्याच्या तक्रारी केल्यावरही लक्षणे असलेल्या कर्मचाऱ्यांची तीन दिवसानंतर तपासणी करण्यात आली. आता संपुर्ण शंभर लोकांचे युनिट कोरोना प्रादृभावाच्या छायेत असल्याने लवकरच "रिलीफ टिम' पोचली नाही तर, काही पळून जाण्याच्या तयारीत असल्याचेही सांगण्यात आले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com