"मास्क'ने प्राणी संक्रमित होतील, हे चुकीचेच! 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 मार्च 2020

कोरोना व्हायरस सर्वत्र पसरत असताना "मास्क' आणि 'हॅण्डग्लोज'चा वापर अधिक प्रमाणात करण्यात येत आहे. शिवाय, तोंडाला रूमाल बांधण्याचे आवाहन देखील करण्यात येत आहे. यासोबत रुमालाचा वापर केल्यास त्यास गरम पाण्याने धुवून स्वच्छ करून वापरण्यास सांगितले जात आहे.

जळगाव : "कोरोना व्हायरस' पसरत असताना त्याला आळा घालण्यासाठी तोंडाला मास्क लावण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मास्कचा वापर वाढला असताना सोशल मीडियावरून विषाणूजन्य मास्क प्राण्यांनी खाल्ल्यास मोठ्या प्रमाणात विषाणू संक्रमण होण्याबाबतचा संदेश फिरविला जात आहे. मात्र, प्राण्यांना अशा प्रकारचे संक्रमण होणे शक्‍य नसल्याचे तज्ज्ञांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. 
कोरोना व्हायरस सर्वत्र पसरत असताना "मास्क' आणि 'हॅण्डग्लोज'चा वापर अधिक प्रमाणात करण्यात येत आहे. शिवाय, तोंडाला रूमाल बांधण्याचे आवाहन देखील करण्यात येत आहे. यासोबत रुमालाचा वापर केल्यास त्यास गरम पाण्याने धुवून स्वच्छ करून वापरण्यास सांगितले जात आहे. परंतु, मास्क वापरल्यानंतर ते फेकण्यात येणार आहे. यामुळे मास्क न फेकता त्यास जाळून किंवा जमिनीत पुरण्यासंदर्भातील संदेश सोशल मीडियावरून फिरत आहे. मात्र, मास्कमुळे कोणत्याही प्रकारचे संक्रमण प्राण्यांमध्ये होणार नसल्याचे मत तज्ज्ञांनी मांडले. 
"डिस्पोजेबल मास्क' कचरापेटीत टाकायला हवेत, पण कचऱ्याची विल्हेवाट योग्य पद्धतीने करणे प्रशासनाची जबाबदारी आहे. कापडी शिवलेले मास्क डेटॉल अथवा सोडियम हायपिक्‍लोराईडयुक्त पाण्याने रोज धुवून पुन्हा वापरू शकतो. सामान्य नागरिकांसाठी कापडाच्या मास्कचा पर्याय उत्तम आहे. कारण त्याने घनकचरा कमी प्रमाणात तयार होईल. जेणेकरुन त्याची विल्हेवाट लावण्याची आवश्‍यकता भासणार नाही. वैद्यकीय वा संबंधित कर्मचाऱ्यांनी डिस्पोजेबल मास्कला प्राधान्य द्यावे, कारण महापालिकेकडे घनकचरा व्यवस्थापनाची सुविधा असते. 

प्राण्यांनी विषाणुयुक्त मास्क खाल्ल्याने प्राणी संक्रमित होऊन परिस्थिती गंभीर होऊ शकते, हे चुकीचे आहे. कारण प्राण्यांच्या पोटात विषाणू जिवंत राहणे शक्‍य नाही. मुळतः विषाणू श्वसनसंस्थेलाच बाधित करतो. मात्र, प्लास्टिकजन्य पदार्थ खाण्यामुळे प्राण्यांना पोटाचे आजार अपेक्षित असतात, जास्त करून गाई, म्हशी व बैल, श्वानांची पचनसंस्था ही मानवाशी मिळती जुळती असल्याने त्यांना विशेष अडचण येत नाही. 
- डॉ. विलास भोळे, एमडी, स्त्रीरोगतज्ज्ञ
 
खरं तर आजच्या घडीला योग्य मास्कची गरज, रुग्ण आणि उपचार करणाऱ्या डॉक्‍टर आणि कर्मचाऱ्यांना आहे. सर्वांनी मास्क वापरणे गरजेचे नाही. त्यापेक्षा घरात राहिलात तर मास्क, सॅनिटायझरचा वापर कमी होईल. तसेच या मास्कची विल्हेवाट योग्यरित्या केली नाही तर त्याचे दुष्परिणाम होणारच आहे. बायोमेडिकल वेस्ट योग्यरित्या संपविणे गरजेचे आहे. 
डॉ. धर्मेंद्र पाटील, सचिव, आयएमए


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon corona mask use and thro animal Infection not possible