"कोरोना, संवेदनशील ठिकाणांवर आता "ड्रोन'ची नजर 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 एप्रिल 2020

शहरातील संवेदनशील ठिकाणांवर आणि "कोरोना विषाणू'च्या पार्श्‍वभूमीवर पोलिस महासंचालक कार्यालयाने सर्वच जिल्हा पोलिस दलांना ड्रोन कॅमेरे उपलब्ध करून दिले आहेत. 

जळगाव: जिल्हा पोलिस दलाच्या ताफ्यात आता शक्तिशाली कॅमेरा असलेला "ड्रोन' दाखल झाला आहे. पोलिस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, अप्पर अधीक्षक भाग्यश्री नवटके यांच्या उपस्थितीत पोलिस कवायत मैदानावर "ड्रोन'ची यशस्वी चाचणी घेण्यात आली. शहरातील संवेदनशील ठिकाणांवर आणि "कोरोना विषाणू'च्या पार्श्‍वभूमीवर पोलिस महासंचालक कार्यालयाने सर्वच जिल्हा पोलिस दलांना ड्रोन कॅमेरे उपलब्ध करून दिले आहेत. 

जिल्हा पोलिस दल पूर्वीपासूनच "पीटीझेड' कॅमेरा असलेल्या वाहनांनी सज्ज असून, आता पोलिस दलाच्या ताफ्यात नव्याने शक्तिशाली कॅमेरा असलेले "ड्रोन' दाखल झाले आहेत. या ड्रोनद्वारे जातीय दंगलीची ठिकाणांची निगराणी करण्यात मोलाची साथ पोलिस दलास लाभणार आहे. दरम्यान, कोरोना विषाणूंचा वाढता प्रभाव पाहता पोलिसदलास संक्रमित झालेल्या परिसरावर नजर ठेवण्यात याचा जास्तीत जास्त उपयोग करता येणार आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, अप्पर अधीक्षक भाग्यश्री नवटके यांनी या ड्रोन कॅमेऱ्याची पोलिस कवायत मैदानावर यशस्वी चाचणी घेतली असून, पोलिसदलाची तांत्रिक टिमला हे ड्रोन सोपविण्यात आले आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon "Corona, now drone's eye on sensitive places