कोरोना संशयीत वृद्धेचा मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 एप्रिल 2020

कोरोनाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून संशयीतांची संख्या देखील वाढतच आहे. कोरोना सदृष्य लक्षणे जाणवत असल्याने शुक्रवारी एका 68 वर्षीय महिलेला कोरोना वार्डात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

जळगाव: कोरोनासदृष्य लक्षणे जाणवत असल्याने उपचार सुरु असलेल्या 68 वर्षीय वयोवृद्ध महिलेचा आज दुपारी 4.30 वाजेच्या सुमारास मृत्यू झाल्याची घटना घडली. या संशयीत रुग्णाचे नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून अद्याप त्याचा अहवाल प्रलंबित आहे. 

नक्‍की पहा - जळगाव शहरात खुल्या मैदानांवर भरणार फळ-भाजी बाजार ! 

कोरोनाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून संशयीतांची संख्या देखील वाढतच आहे. कोरोना सदृष्य लक्षणे जाणवत असल्याने शुक्रवारी एका 68 वर्षीय महिलेला कोरोना वार्डात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. या महिलेवर उपचार सुरु असतांना त्या महिलेचा आज दुपारी 4.30 वाजेच्या सुमारास मृत्यू झाला. या महिलेचे नमूने धूळे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. मात्र त्याचा अहवाल अद्याप प्रलंबित असल्याने या महिलेचा मृत्यू कोरोनामूळे झाला की इतर अन्य कारणामूळे झाला याबाबत स्पष्टता होईल. 

कोरोना संशयीताचा 9 वा बळी 
कोरोना संशयीत रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून आतापर्यंत कोरोना सदृष्य लक्षणे जाणवत असलेल्या रुग्णांमधील 8 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये या रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह आला असून त्यांचा मृत्यू इतर कारणांमूळे झाले असल्याचे समोर आले आहे. शनिवारी देखील एका 68 वर्षीय महिलेचा संशयीताचा मृत्यू झाला असून त्यांचा अहवाल प्रलंबित आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर त्या महिलेच्या मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होईल. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon corona Suspected old woman dead