या ऍपमधून स्वतःच करा कोरोनाची तपासणी

aarogya setu
aarogya setu

जळगाव : संपूर्ण जगात "कोविड- 19' या विषाणूजन्य आजाराने थैमान घातले आहे. यामुळे एखाद्याला साधा ताप, सर्दी, खोकला आला तरी "कोरोना व्हायरस'च्या तपासणीसाठी रुग्णालयात उपचारासाठी दाखल व्हावे लागणार असल्याची भीती नागरिकांमध्ये जाणवू लागली आहे. सोशल डिस्टन्सिंग' व स्वच्छता हाच "कोरोना विषाणू'वर मात करण्यासाठी एकमेव पर्याय असल्यामुळे त्याबाबत जागृती करणारे, मार्गदर्शक ठरणारे केंद्रीय आरोग्य खात्याने तयार केलेले "आरोग्य सेतू' हे ऍप सध्या अत्यंत महत्त्वपूर्ण ठरत आहे. 
"आरोग्य सेतू' या ऍपमुळे माहिती घरबसल्या मिळते. शिवाय, तुम्हाला स्वतःहून हॉस्पिटलला जाण्याची गरज नाही, कोरोना लक्षणाचा संशय असलेले कोणीही या ऍपचा वापर करून घरबसल्या माहिती घेऊन उपचारही घेऊ शकता येणार आहे. देशातील नागरिकांना "कोरोना व्हायरस' साथीच्या रोगाचा प्रसार रोखण्यात मदत करण्याची संधी या ऍपच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली आहे. 

ऍपचे नेमके काम काय? 
प्ले स्टोअरमधून डाऊनलोड होऊ शकणाऱ्या "आरोग्य सेतू' ऍपमध्ये सुरवातीलाच कोरोना संक्रमणाचा धोका कसा कमी करता येतो, याची माहिती दिली आहे. ही माहिती अकरा भाषांमध्ये आहे. भाषा निवडल्यानंतर त्यामध्ये आपले नाव, वय, लिंग आदी माहिती भरून द्यावी लागते. त्यानंतर कफ, ताप, श्वास घेण्यात अडचणी असा त्रास असल्यास ती माहिती भरावी. तसेच, गेल्या काही दिवसांत आंतरराष्ट्रीय प्रवास केला आहे का? हे विचारले जाते. आरोग्य सेतू आपला ब्लूटूथ आणि मोबाईल लोकेशनद्वारे "कोविड-19 पॉझिटिव्ह चाचणी घेऊ शकणाऱ्या एखाद्या व्यक्तीबरोबर सामाजिक आलेखाद्वारे आपला संवाद ट्रॅक करतो. 

पुढील प्रक्रिया काय? 
"आरोग्य सेतू' ऍपद्वारे या ऍपमध्ये भरलेल्या माहितीनुसार एखाद्यामध्ये जर "कोरोना पॉझिटिव्ह' लक्षणे असतील, तर त्याची तातडीने नोंद हे ऍप घेते. या ऍपमध्ये जे हेल्पलाइन क्रमांक आहेत, त्याद्वारे डिस्ट्रिक्‍ट कमांड कंट्रोलला माहिती दिली जाते. यानंतर सदर व्यक्ती राहात असलेल्या परिसरात सामान्य रुग्णालयात त्याची माहिती संबंधिताला दिली जाते. पुढे कोणते उपचार करून घ्यायचे, याची फोनवरून कल्पना दिली जाते. जर रुग्णाची प्रकृती अधिकच गंभीर असल्यास आरोग्य पथक संबंधिताच्या घरी जाते. आणि आवश्‍यकता भासल्यास रुग्णाला पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात येते. 

अशी करा ही ऍप हॅन्डल 
ऍप स्थापित केल्यानंतर आपल्या स्मार्टफोनमध्ये ब्लूटूथ आणि लोकेशन चालू करा. यामुळे आपण कोविड-19 "पॉझिटिव्ह' रुग्ण समोर आल्यास आपल्याला हे ऍप सतर्क करते. तसेच ऍप अलर्टद्वारे विलगीकरणाविषयी (क्वारंटाईन) सूचना आणि जर लक्षणे उत्पन्न झाल्यास काय करावे, याविषयी मदत आणि माहिती देखील दिली जाते. कोविड-19 पॉझिटिव्ह चाचणी घेतलेल्या एखाद्या व्यक्तीबरोबर जर आपण रस्ता ओलांडला असेल तर आपल्याला माहितीही आपणास कळविले जाते. आरोग्य सेतूच्या मदतीने आपण स्वतःचे, आपल्या कुटुंबाचे आणि मित्रांचे रक्षण करू शकतात आणि "कोविड-19'शी लढण्याच्या प्रयत्नात देशास मदत करू शकता. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com