जळगाव जिल्हा त्रीशतकाच्या उंबरठ्यावर 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 18 May 2020

राज्यासह देशभरात कोरोनाचा हाहाकार सुरु आहे. दररोज कोरोनाग्रस्तांची संख्या दुपटीने वाढत असल्याने नागरिकांमध्ये भितचे वातावरण पसरलेले आहे. जिल्ह्यातील विविध तालुक्‍यातील स्वॅब घेतलेल्या 94 कोरोना संशयित व्यक्तीचे नमुना तपासणी अहवाल आज प्राप्त झाले आहे.

जळगाव : जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असल्याने जिल्हा प्रशासनाकडून चिंता व्यक्त केली जात आहे. आज जिल्ह्यातील 18 व्यक्तींचे नमुने पॉझिटिव्ह आले असून जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 297 वर पोहचली असल्याने जळगाव जिल्हा त्रिशतकाचा उंबठरठ्यावर पोहचला आहे. 

राज्यासह देशभरात कोरोनाचा हाहाकार सुरु आहे. दररोज कोरोनाग्रस्तांची संख्या दुपटीने वाढत असल्याने नागरिकांमध्ये भितचे वातावरण पसरलेले आहे. जिल्ह्यातील विविध तालुक्‍यातील स्वॅब घेतलेल्या 94 कोरोना संशयित व्यक्तीचे नमुना तपासणी अहवाल आज प्राप्त झाले आहे. यातील 76 व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असून 18 व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तींमध्ये जळगावातील 11, भुसावळातील 3, भडगाव व पाचोरा येथील प्रत्येकी एक तर यावल तालुक्‍यातील कोरपावली येथील दोन अशा एकूण 18 जणांचा समावेश आहे. जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 297 वर पोहचला आहे. यातील 77 जणांनी कोरोनावर मात केली आहे. 

मुख्यालयातील कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण 
जळगाव शहरातील दक्षता नगरातील पोलिस कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली असून त्याचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला आहे. हा कर्मचारी पोलिस मुख्यालयात वाहनावर चालक असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मुख्यालयातील पोलिस कर्मचाऱ्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने पोलिस मुख्यालयातील कर्मचाऱ्यांमध्ये चांगलेच भितीचे वातावरण निर्माण झाले होते. 

प्रशासनाची चिंता वाढली 
जिल्ह्यात गेल्या तीन आठवड्यात कोरोनाग्रस्तांची संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचाआकडा तीनशेच्या उंबरठ्यावर पोहचला असल्याने प्रशासनाची चिंता आणखी चांगलीच वाढलेली दिसते. 

तरीही प्रशासनाचे दुर्लक्ष 
शहरात 31 मे पर्यंत लॉकडाऊन वाढविण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. शहरात दुसऱ्या लॉकडाऊनपासून पोलिस प्रशासन, जिल्हाप्रशासन, महापालिका प्रशासनाकडून लॉकडाऊनचे नियमांबाबत दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळेच जिल्ह्यात कोरोनाचा फेैलाव मोठया प्रमाणात झाला असल्याने जळगाव जिल्ह्याचे मालेगावात रुपांतर झाले आहे. या सर्व परिस्थितीला जिल्हा प्रशासन स्थानीक प्रशासनच जबाबदार असल्याचे चित्र संपूर्ण जिल्ह्यात दिसून येत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon corona virus positive case threshold of three hundred