जळगावात सोळा महिन्यांच्या बाळासह तीन जण कोरोनाचे संशयीत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 मार्च 2020

जिल्ह्यात देखील कोरोनाचे संशयीत रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून एरंडोल तालुक्‍यातील खडका येथील सोळा महिन्यांच्या बाळावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु होते.

जळगाव : देशात दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. जिल्ह्यात देखील कोरोनाचे संशयीत रुग्णदाखल होत आहे. आज जिल्हा वैद्यकीय रुग्णालयात सोळा महिन्याच्या बाळासह एकाच कुटूंबातील तीन संशयीत दाखल करण्यात आले आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील संशयीतांची संख्या 39 वर झाली असून यातील एकही संशयीत रुग्ण पॉझिटिव्ह नाही आहे. 

संपूर्ण जगात कोरोनाने हाहाकार माजविला असून दररोज कोरोनाचे संशयीत रुग्ण वाढत आहे. जिल्ह्यात देखील कोरोनाचे संशयीत रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून एरंडोल तालुक्‍यातील खडका येथील सोळा महिन्यांच्या बाळावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु होते. आज या बाळाला ताप, सर्दी, खोकला व श्‍वास घेण्यास त्रास घेण्यास त्रास जाणवत असल्याने या बाळाला कोरोना कक्षात दाखल करुन त्याच्यावर उपचार सुरु आहे. तसेच जळगावातील एकाच कुटूंबातील तीन जणांना सर्दी, खोकला, तापासह घशात त्रास होत असल्याने ते देखील कोरोना कक्षात दाखल झाले आहे. यामध्ये 72 वर्षीय वृद्ध महिला, 45 वर्षीय वयस्कर गृहस्थ व 24 वर्षाचा युवकाचा समावेश आहे. या चौघ संशयीतांच्या थुंकींचे नमुने तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात आले आहे. 

संशयीतांची संख्या 39 वर 
कोरोनाच्या संशयीतांच्या संख्येत वाढ होत असून आज चार नवीन संशयीत दाखल झाले आहे. त्यामुळे संशयीतांची संख्या ही 39 वर पोहचली आहे. यापैकी 31 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून 2 जणांचे रिजेक्‍ट करण्यात आले आहे तर 6 जणांचे अहवाल प्रलंबीत असल्याची माहिती वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांनी दिली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon corona virus Suspected patient 16 mounth child and three other