कोरोना वॉर्डात अमळनेरच्या एकाचा मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 एप्रिल 2020

आज सकाळी साडेअकराच्या सुमारास जळगावच्या कोरोना वॉर्डात ऍडमीट असलेल्या एका रूग्णाचा मृत्यू झाला असून, अडीच तासांपासून मृतदेह उचलण्यात आला नसल्याची माहिती समोर येत आहे.

जळगाव ः कोरोना व्हायरसचा वाढत्या प्रादुर्भावाने संशयीत आणि पॉझिटीव्ह मृत रूग्णांची संख्या वाढत आहे. यातच आज सकाळी साडेअकराच्या सुमारास जळगावच्या कोरोना वॉर्डात ऍडमीट असलेल्या अमळनेरच्या एका रूग्णाचा मृत्यू झाला असून, अडीच तासांपासून मृतदेह उचलण्यात आला नसल्याची माहिती समोर येत आहे. 
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. यात जळगाव जिल्हा देखील रेडझोनमध्ये गेला असून, यात अमळनेर हॉटस्पॉट झाला असून, यानंतर जळगाव शहर, भुसावळ, पाचोरा येथे रूग्ण आढळून आले आहेत. जळगाव शासकिय वैद्यकिय महाविद्यालय हे कोरोना व्हॉस्पिटल झाले असून याठिकाणी संशयीत व कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. यात रूग्णालयातील कोरोना वॉर्डात रूग्णांवर उपचार सुरू आहेत. 

अडीच तासांपुर्वी मृत्यू 
कोरोना व्हॉस्पीटलमधील कोरोना वॉर्डात दाखल असलेल्या एका 65 वर्षी इसमाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. वॉर्डात दाखल इसम हा गेल्या दोन- तीन दिवसांपासून काहीच खात नसल्याची माहिती मिळाली असून, काल त्यास व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले होते. दरम्यान आज सकाळी साडेअकराच्या सुमारास मृत्यू झाला असून, तो मृतदेह उचलण्यासाठी कोणी आले नसल्याने वॉर्डातील अन्य रूग्ण हे भयभीत झाले आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon corona ward one death morning